Chetan Chanddrra Attacked: कन्नड अभिनेता चेतन चंद्रावर हल्ला; रक्तबंबाळ झालेल्या अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करून मागितला न्याय, पहा व्हिडिओ
त्याने जवळच्या रुग्णालयात जाऊन स्वतःवर उपचार केले. यादरम्यान त्याने इन्स्टा वर लाईव्ह जाऊन चाहत्यांना या हल्ल्याची माहिती दिली. तसेच न्यायाची मागणी जोर धरत या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले.
Chetan Chanddrra Attacked: कन्नड अभिनेता चेतन चंद्रा (Chetan Chanddrra) बद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे. रविवारी रात्री उशिरा चेतन चंद्रावर बेंगळुरूजवळील कागलीपुरा येथे सुमारे 20 लोकांनी हल्ला (Mob Attack) केला. ज्याची माहिती त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. चेतन चंद्रा PUC, प्रेमिज्म, राजधानी आणि जरासंध सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसला आहे. संपूर्ण देश रविवारी मातृदिन साजरा करत होता. अशा स्थितीत अभिनेता चेतन चंद्राही आपल्या आईला घेऊन मंदिरात गेला. दर्शन घेऊन परतत असताना सुमारे 20 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. अभिनेत्याने त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सांगत आहे की एका मद्यधुंद व्यक्तीने त्याच्या कारला धडक दिली. यानंतर अनेकांनी त्याच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. यानंतर कागलीपुराजवळ मोठा जमाव जमला आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. (हेही वाचा -
या हल्ल्यात चेतन चंद्रा गंभीर जखमी झाला. त्याने जवळच्या रुग्णालयात जाऊन स्वतःवर उपचार केले. यादरम्यान त्याने इन्स्टा वर लाईव्ह जाऊन चाहत्यांना या हल्ल्याची माहिती दिली. तसेच न्यायाची मागणी जोर धरत या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. (वाचा - Actor Allu Arjun Cast His Vote: फिल्मस्टार अल्लू अर्जुनने हैदराबादमध्ये केले मतदान, व्हिडीओ व्हायरल)
अभिनेत्याने शेअर केला रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडिओ -
कोण आहे चेतन चंद्रा ?
चेतन चंद्र यांचा जन्म केबी रामचंद्र आणि बीएन अनुसूया यांच्या पोटी झाला. केबी रामचंद्र हे मलेशियामध्ये खाण अभियंता आहेत. चंद्रा हे इन्फॉर्मेटिक्स इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर आहेत. या अभिनेत्याने 2008 मध्ये PUC या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, परंतु त्याला खरी ओळख मिळाली ती प्रेमिज्म (2010) या चित्रपटातून.