Lockdown In India: लॉकडाऊनमुळे बॉलिवुड अभिनेता अर्जुन रामपाल संपूर्ण कुटुंबियासह कर्जतमध्ये अडकला

सरकार तसेच अनेक कलाकार जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे बॉलिवुड अभिनेता अर्जुन रामपाल संपूर्ण कुटुंबियासह कर्जतमध्ये अडकला आहे. अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट लिहून माहिती दिली आहे. या पोस्टसोबत त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

अर्जुन रामपाल (PC - Instagram)

Lockdown In India: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. सरकार तसेच अनेक कलाकार जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे बॉलिवुड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) संपूर्ण कुटुंबियासह कर्जतमध्ये अडकला आहे. अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट लिहून माहिती दिली आहे. या पोस्टसोबत त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अर्जुनने सांगितलं आहे की, लॉकडाऊन घोषित होण्याअगोदर मी एका सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी कर्जतमध्ये आलो होतो. परंतु, लॉकडाऊनमुळे मी येथे अडकलो आहे. माझी ही अवस्था पाहून तुम्हाला मी साधू बनलो आहे का? असा प्रश्न नक्की पडला असेल. मात्र, कोरोना व्हायरसमुळे सर्वांवरचं एखाद्या साधुसारखे जीवन जगण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर पडू नका, असंही अर्जुनने म्हटलं आहे. (हेही वाचा - जॉनी लीवर ने आपल्या विनोदी अंदाजात नागरिकांना दिला घरी राहण्याचा सल्ला, पोट धरून हसायला लावणार व्हिडिओ नक्की पाहा)

 

View this post on Instagram

 

Janta curfew, (sorry post has gone late due to network issues).

A post shared by Arjun (@rampal72) on

 

View this post on Instagram

 

Don’t leave home without it, wear ur masks, carry hand sanitiser, don’t shake hands, avoid crowded places, be responsible. Don’t catch this damn virus. Be safe and a big namaste 🙏🏽 love

A post shared by Arjun (@rampal72) on

अर्जुन त्याच कुटुंब म्हणजेच त्याची प्रेयसी गैब्रिएला आणि सात महिन्यांच्या मुलासोबत कर्जतमध्ये सुरक्षित आहे. 2018 मध्ये अर्जुनने आपली पत्नी माजी मिस इंडिया मेहर जेसिया हिच्यासोबतच्या आपल्या 20 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम दिला होता. या दोघांमध्ये खूप काळ वाद सुरू होता त्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. सध्या अर्जुन प्रियसी गैब्रिएलासोबत खुश असून कर्जतमध्ये त्यांच्यासोबत वेळ घालवत आहे.