Tiger 3 First Song: टायगर 3 चित्रपटात अरिजित सिंगने गायलं सलमानसाठी गाणं; अभिनेत्याने शेअर केलं पोस्टर

सलमान आणि अरिजित यांच्यातील अनेक वर्षांचा वाद संपुष्टात आला असून दोघांमध्ये पॅचअप झाला आहे. अरिजीतने टायगर 3 मध्येही सलमानसाठी गाणं गायलं आहे. सलमान खानचे हे गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्याची पहिली झलक खुद्द अभिनेत्याने शेअर केली आहे.

Tiger 3 First Song: टायगर 3 चित्रपटात अरिजित सिंगने गायलं सलमानसाठी गाणं; अभिनेत्याने शेअर केलं पोस्टर
Tiger 3 First Song Poster (PC - Instagram)

Tiger 3 First Song: सलमान खान (Salman Khan) आणि अरिजित सिंग (Arijit Singh) यांच्यातील पॅचअपच्या बातम्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अरिजित सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये स्पॉट झाला होता. आता सलमान खानने स्वतः या वृत्ताला होकार दिला आहे. सलमान आणि अरिजित यांच्यातील अनेक वर्षांचा वाद संपुष्टात आला असून दोघांमध्ये पॅचअप झाला आहे. अरिजीतने टायगर 3 मध्येही सलमानसाठी गाणं गायलं आहे. सलमान खानचे हे गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्याची पहिली झलक खुद्द अभिनेत्याने शेअर केली आहे.

सलमान खानने इंस्टाग्रामवर या गाण्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान आणि कतरिना फुल स्वॅगमध्ये दिसत आहेत. या गाण्याचे शीर्षक 'लेके प्रभु का नाम आहे' जे अरिजित सिंगने गायले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले- 'पहिल्या गाण्याची पहिली झलक. . #LekePrabhuKaNaam! 'हे आहे माझ्यासाठी अरिजित सिंगचे पहिले गाणे आहे.' यासोबतच सलमानने ते 23 ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचं सांगितलं आहे. (हेही वाचा -Dream Girl 2 OTT Release: आयुष्मान-अनन्याचा 'ड्रीम गर्ल 2' ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कुठे होणार स्ट्रीम? जाणून घ्या?)

सलमान आणि अरिजितमध्ये काही वर्षांपूर्वी एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान वाद झाला होता. असे म्हटले जाते की, यानंतर सलमानला त्याचा राग आला आणि त्याने अरिजितला त्याच्या चित्रपटातील एका गाण्यातून काढून टाकले. पण आता दोघांचे पॅचअप झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार चित्रपट -

यावेळी 12 नोव्हेंबरला सलमान खानचा टायगर 3 प्रदर्शित होणार आहे, म्हणजेच भाईजानने दिवाळीला धमाका करण्याचे ठरवले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे जो चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अशातचं आता चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2023 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).