Arijit Singh Injured During Live Performance: औरंगाबादमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अरिजित सिंग जखमी, Watch Video

स्टेजवर गाताना एका चाहत्याने त्याचा हात जबरदस्तीने ओढला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Arijit Singh (PC - Twitter)

Arijit Singh Injured During Live Performance: सुरेल आवाजाने समृद्ध असलेला अरिजित सिंग (Arijit Singh) सर्वांनाचं परिचित आहे. 'तुम ही हो' आणि 'हमरी अधुरी कहानी' सारख्या गाण्यांमधून त्याने आपल्या आवाजाने रसिकांवर चांगलीच जादू निर्माण केली आहे. त्याच वेळी, अरिजित सिंगशी संबंधित एक बातमी समोर येत आहे, ही बातमी वाचून कदाचित त्याचे चाहते नाराज होऊ शकतात. औरंगाबादमध्ये एका लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान अरिजित सिंग जखमी झाला. स्टेजवर गाताना एका चाहत्याने त्याचा हात जबरदस्तीने ओढला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

औरंगाबादमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अरिजित सिंग जखमी झाला होता. लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान, अरिजित सिंगच्या एका चाहत्याने त्याचा हात ओढलाय दुसरीकडे, अरिजित सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अरिजित सिंगच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अरिजित "तू मला खेचत आहेस, माझा हात थरथरत आहे. मी माझा हात हलवू शकत नाही" असे म्हणताना दिसत आहे. यासोबतच चाहते सतत या व्हिडिओवर कमेंट करून गायकाची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. (हेही वाचा - Akshay Kumar-Raveena Tandon Video: ब्रेकअपनंतर तब्बल 22 वर्षांनी एकत्र दिसले अक्षय कुमार आणि रवीना टंडन, पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arijit Singh (@arijitsinghliveupdates)

अरिजित सिंग बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे, ज्यांच्या आवाजाचे सर्वांनाच वेड लागले आहे. त्याचबरोबर अरिजित सिंगला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. अरिजितचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी गायकाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अरिजित सिंगने अद्याप या घटनेवर भाष्य केलेले नाही, परंतु भविष्यातील कामगिरीदरम्यान त्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तो आवश्यक ती खबरदारी घेईल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.