Giorgia Andriani, Arbaaz Khan & Salman Khan (Photo Credits: Instagram)

Merry Christmas 2020: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सध्या इंटरनेटवर हिट ठरत आहे. सोशल मीडियावर एक हॉट फोटो (Hot Photo) शेअर करत तिने ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोत तिचा सेक्सी अंदाज लक्षवेधी ठरत आहे. या हॉट फोटोसह तिने तिच्या चाहत्यांना आणि इंस्टा फॅमेलीला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जॉर्जिया ने हा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले की, "मेरी ख्रिसमस इंस्टा फॅमेली. तुम्ही सर्वजण ठीक असला अशी आशा आहे. तर सांगा मग यंदा सांता तुमच्यासाठी काय घेऊन आला? ख्रिसमसच्या शुभेच्छा!"

पहा फोटो:

जॉर्जिया इटालियन मॉडल आणि अभिनेत्री आहे. तिच्या या हॉट फोटोवर कमेंट करत सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा, अभिनेत्री अली अवराम यांच्यासमवेत अन्य सेलिब्रिटींनी तिला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2017 मध्ये मलायका अरोरा सोबत घटस्फोट घेतल्यानंतर काही दिवसातच अरबाज आणि जॉर्जिया ला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर त्या दोघांना अनेक एकत्र स्पॉट करण्यात आले. तसंच त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टवरुन ते दोघेही डेट करत असल्याचे स्पष्ट झाले.

अरबाज आणि जॉर्जिया लवकरच लग्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच यांच्या लग्नासंदर्भात खान कुटुंबियांमध्ये चर्चा सुरु असल्याचेही बोलले जात आहे.