नव वधू-वराला अनुष्का आणि विराट देतायात 'हा' सल्ला - पाहा व्हिडिओ
विराट कोहली -अनुष्का शर्मा (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा क्रिकेटर विराट कोहली या दोघांनी वर्ष भरापूर्वी लग्न केले. त्यानंतर या दोघांच्या प्रेम प्रकरणापासून ते लग्नापर्यंतच्या सर्व गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना होती. तसेच या दोघांनी प्रेक्षकांच्या नकळत मान्यवर या कपड्यांच्या ब्रॅंडमधून आपले लग्नाआधीचे फोटोशूट केले आणि त्याचा एक व्हिडिओ ही बनवला होता.मात्र या व्हिडिओनंतर अखेर त्यांचे लग्न झालेच. परंतु आता विराट आणि अनुष्का एका नव वधू-वराला नवरा बायकोमधील संबंध टिकून रहण्यासाठी 'हा' सल्ला देताना दिसून येत आहेत.

मान्यवर या कपड्यांच्या ब्रॅंडमधून अनुष्का आणि विराट पुन्हा एकदा झळकल्याचा व्हिडिओ अनुष्काने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का एकमेकांना लग्नानंतर विविध गोष्टींसाठीची आश्वासने देताना दिसले होते.तर मान्यवर मोहे मधून या दोघांनी नव वधूवराला लग्नानंतर नवरा बायकोमध्ये कोणत्या गोष्टी घडतात हे सांगताना दिसत आहे. परंतु एकमेकांना समजून घेतल्यास नाते अजून किती घट्ट होते हे सुद्धा विराट आणि अनुष्का या दोघांना या व्हिडिओमधून पटवून देत आहे.

 

View this post on Instagram

 

Celebrating love everyday #SaathSaathHamesha ✨🌟 @manyavarmohey @virat.kohli

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

तर अनुष्का आणि विराट हे दोघे त्यांच्या आयुष्यात खूप खुश असल्याचे दिसून येत आहे. तसेच विराट आणि अनुष्काच्या जोडीला  सोशल मीडियावर ही प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत असते.