Anurag Kashyap Accused Of Sexual Exploitation: अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर सोडलं मौन; म्हणाला 'थोडी तरी मर्यादा ठेवा मॅडम'
या घटनेनंतर सोशल मीडियावर अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, आता अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर मौन सोडलं आहे.
Anurag Kashyap Accused Of Sexual Exploitation: दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyp) वर तेलुगु अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा (Sexual Assault) आरोप केला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, आता अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर मौन सोडलं आहे.
अनुरागने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये अनुराग यांनी लिहिलं आहे की, 'काय प्रकरण आहे, मला शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी बराच वेळ लागला. असूद्या काही नाही. मला गप्प करण्यासाठी येवढं खोट बोललं जात आहे की, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रियांनाही यात ओढण्यात आलं आहे. थोडी तरी मर्यादा राखा. तुम्ही लावलेले सर्व आरोप निराधार आहेत.' (हेही वाचा -Anurag Kashyap Accused of Sexual Assault: अनुराग कश्यप वर तेलुगु अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; ट्विटरवर ट्रेंड झाला #ArrestAnuragKashyap)
बाकी माझ्यावर आरोप ठेवणे, अभिनेत्यांना आणि बच्चन कुटुंबीयांना एकत्र करून आरोप लावणं कठीण आहे. मॅडमचे दोन लग्न केले आहेत. परंतु, हा गुन्हा असेल तर मंजूर आहे आणि खूप प्रेम केलं आहे. हे पण कबूल करतो. माझी पहिली पत्नी असो किंवा दुसरी. याशिवाय कोणतीही प्रेमिका किंवा ज्या अभिनेत्र्यासोबत मी काम केलं. किंवा मी ज्या महिलांसोबत काम केलं. तसेच आतापर्यंत ज्या महिलांना भेटलो, त्या सर्व महिला, असंही अनुरागने म्हटलं आहे.