अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर असा दिसू लागला Anurag Kashyap? मुलगी Aaliyah Kashyap शेअर केला Photo

अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर अनुराग कश्यपचा समोर आलेला हा नवा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Anurag Kashyap (Photo Credits: Instagram)

Anurag Kashyap New Look: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप चा एक नवा फोटो समोर येत आहे. अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर अनुराग कश्यपचा समोर आलेला हा नवा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनुरागची मुलगी आलिया कश्यप हिने हा फोटो शेअर केला असून यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या फोटोवर लोक विविध प्रतिक्रीया देखील देत आहेत. (केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अनुराश कश्यप याच्या 'मी टू' वादावर सौडले मौन, सांगितली 'ही' महत्वाची गोष्ट)

आलियाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. दिग्दर्शकाचा हा नवा लूक असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र हा फोटो स्नॅपचॅट फिल्टर वापरुन बनवण्यात आला आहे. अलिकडेच अनुराग कश्यप वर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्याच्या प्रवक्तांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते. हृदयातील ब्लॉकेजेसमुळे अँजिओप्लास्टी करण्यात आली असून आता हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आलिया कश्यप ने शेयर केला वडील अनुराग कश्यप चा फोटो (Photo Credits: Instagram)

छाती दुखू लागल्यामुळे अनुरागला हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस हृदयात ब्लॉकेजेस असल्याचे समोर आले आणि ताबडतोब सर्जरी करावी लागली. सध्या त्याला आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार विश्रांती घेत असलेल्या अनुरागला लवकरच शूटिंगच्या सेटवर परतण्याचे वेध लागले आहेत. (Anurag Kashyap आणि Taapsee Pannu ने आयकर विभागाच्या छाप्यानंतर चित्रपटाच्या सेटवरून दोघांचा एक खास फोटो केला शेअर)

दरम्यान, अनुराग कश्यप चे नाव सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. #MeToo केसनंतर काही दिवसांपूर्वी त्याच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif