Anurag Kashyap आणि Taapsee Pannu ने आयकर विभागाच्या छाप्यानंतर चित्रपटाच्या सेटवरून दोघांचा एक खास फोटो केला शेअर

तापसी पुन्हा एकदा अनुराग कश्यप सोबत एका चित्रपटात काम करणार आहे.

Anurag Kashyap (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) यांच्या मुंबईतील घरावर आणि ऑफिसवर आयकर विभागाने (IT Raid) काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. यानंतर सोशल मिडियावर याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर तापसी पन्नू या कारवाईवर आपले मौन सोडून यावर प्रतिक्रिया दिली. त्यातच आता तापसी आणि अनुराग कश्यप या दोघांचा चित्रपटाच्या सेटवरुन एकत्र फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दोघेही कॅमे-यासमोर छान हसत पोज देताना दिसत आहे. तापसी पुन्हा एकदा अनुराग कश्यप सोबत एका चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे, 'दोबारा'. या पोस्टच्या माध्यमातून अनुराग कश्यपने आपल्या नापसंत करणा-यांसाठी एक संदेश दिला आहे.

या फोटोमध्ये तापसी एका खुर्चीवर बसली असून तिच्या पायावर अभिनव कश्यप बसले आहेत. दोघेही या फोटोमध्ये निखळ हसताना दिसत आहे. या फोटोखाली 'आम्ही पुन्हा एकदा सुरु करत आहोत 'दोबारा'. आम्हाला नापसंत करणा-यांना आमचे खूप सारे प्रेम.' असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.हेदेखील वाचा- Anurag Kashyap-Taapsee Pannu यांच्या घरावरील आयटी छाप्यानंतर Kangana Ranaut चे ट्विट; केले 'हे' गंभीर आरोप

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

याआधी तापसी पन्नू ने ट्विट करुन मुख्य रुपवरुन 3 दिवसांत 3 गोष्टी शोधल्या गेल्या आहेत. ते कथित बंगले ज्यांची चावी जी मी पॅरिसमध्ये खरेदी केले आहेत. त्या कथित 5 कोटी रुपयांची रोख रकमेची आणि त्याचबरोबर 2013 मध्ये टाकलेल्या छाप्याची.. असे ट्विट तापसीने केले आहे.