Anup Jalota-Jasleen Matharu Viral Wedding Photo: अनूप जलोटा यांनी सांगितले जसलीन मथारू सोबतच्या व्हायरल वेडिंग फोटो मागील सत्य!
बिग बॉसच्या सीजनध्ये अनूप जलोटा आणि जसलीन मथारु ही जोडी प्रचंड गाजली. सध्या या दोघांचा वेडिंग फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात दोघेही नवरा-नवरीच्या रुपात दिसत आहेत. त्यामुळे चाहते, नेटकरी अवाक् झाले आहेत.
बिग बॉसच्या 12 व्या सीजनध्ये अनूप जलोटा (Anup Jalota) आणि जसलीन मथारु (Jasleen Matharu) ही जोडी प्रचंड गाजली. सध्या या दोघांचा वेडिंग फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात दोघेही नवरा-नवरीच्या रुपात दिसत आहेत. त्यामुळे चाहते, नेटकरी अवाक् झाले आहेत. तसंच अनूप जलोटा आणि जसलीन मथारु यांनी लग्न केल्याचीही चर्चाही सोशल मीडिता रंगली. मात्र आता या फोटोमागील सत्य समोर आले आहे. हा फोटो त्यांच्या आगामी सिनेमा 'वो मेरी स्टूडेंट है' मधील आहे. या सिनेमातील एका सीनसाठी आम्ही नवरा-नवरीप्रमाणे तयार झालो होतो, असे अनूप जलोटा यांनी सांगितले.
इंडिया टुडेशी बोलताना अनूप जलोटा यांनी सांगितले की, "हे जसे दिसते तसे नाही. हा फोटो त्यांच्या 'वो मेरी स्टूडेंट है' सिनेमातील एका सीन दरम्यान काढलेला आहे. हा एक ड्रिम सीक्वेंस आहे. यात जसलीनचे लग्न होत असते आणि मी तिच्या वडीलांची भूमिका साकारत आहे. अनेक लग्नसोहळ्यांत वडील, वऱ्डारी देखील पगडी घालतात. त्यामुळे सिनेमाच्या शूटिंग दरम्यान काढलेला हा फोटो आहे. तो अजिबात फेक नाही. परंतु, त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. दरम्यान, सिनेमाचे केवळ दोन दिवसांचे शूटिंग बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले."
पहा फोटोज:
हा फोटो त्यांची प्रतिमा मलीन करु शकतो, असा प्रश्न विचारताच अनूप म्हणाले, "लोक माझ्याबद्दल काय बोलतात किंवा माझे नाव कोणासोबत जोडतात, अशा गोष्टींचा मी स्वतःवर परिणाम करुन घेत नाही. मी केवळ माझे काम करत राहतो. लोक काय बोलतील, याचा विचारच करत नाही. आणि प्रतिमेबद्दल बोलायचे झाल्यास प्रतिमा बनवली नाही कमावली जाते. त्यामुळे अशा गोष्टी ती मलीन करु शकत नाहीत."
लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस 12 मध्ये अनूप-जसलीन कपल म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यानंतर त्या दोघांचे गुरु-शिष्याचे नाते असल्याचे अनूप यांनी स्पष्ट केले. तर बिग बॉसच्या घरात जसलीनने अनूप यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितल्याने ही जोडी चांगलीच चर्चेत होती.
(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2020 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

