Anup Jalota-Jasleen Matharu Wedding Photo: ज्येष्ठ गायक अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी केले गुपचूप लग्न? जाणून घ्या या व्हायरल फोटोमागचे सत्य

जसलीन मथारू ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने लग्नाचा लेहंगा घातला असून तिच्या बाजूला शेरवानी आणि डोक्यावर फेटा घालून अनुप जलोटा बसले आहेत. या फोटोमध्ये हे दोघेही छान हसताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांनी गुपचूप लग्न केले आहे अशी चर्चा रंगू लागली आहे.

Anup Jalota-Jasleen Matharu Wedding Photo: ज्येष्ठ गायक अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी केले गुपचूप लग्न? जाणून घ्या या व्हायरल फोटोमागचे सत्य
Anup Jalota And Jasleen Matharu (Photo Credits: Instagram)

हिंदी बिग बॉस 12 (Bigg Boss 12) मध्ये बरीच चर्चेत आलेली गुरु शिष्याची जोडी अनुप जलोटा आणि जसलीन मथारू (Anup Jalota And Jasleen Matharu) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. याला कारण आहे जसलीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केलेला फोटो. या फोटोमध्ये जसलीन आणि तिचे गुरु ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांनी लग्नाचा वेश परिधान केला आहे. तिच्या या फोटोने तिचे चाहत्यांना धक्का बसला असून तिने हे का आणि कधी केले असे अनेक प्रश्न तिला विचारू लागले. तिचा हा इतका धक्कादायक असून सुद्धा जसलीनने या फोटोला काहीच कॅप्शन दिले नसल्याने तिचे काही चाहते संभ्रमातही पडले आहेत. यामुळे या फोटोमागचे नेमकं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी सर्वच आतुर आहेत.

जसलीन मथारू ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने लग्नाचा लेहंगा घातला असून तिच्या बाजूला शेरवानी आणि डोक्यावर फेटा घालून अनुप जलोटा बसले आहेत. या फोटोमध्ये हे दोघेही छान हसताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांनी गुपचूप लग्न केले आहे अशी चर्चा रंगू लागली आहे.

हेदेखील वाचा- बिग बॉस 12 स्पर्धक जसलीन मथारू हिच्या हॉट बिकीनी फोटोजची सोशल मीडियात धूम (Photos)

View this post on Instagram

🔥🔥 @anupjalotaonline

A post shared by Jasleen Matharu ਜਸਲੀਨ ਮਠਾੜੂ (@jasleenmatharu) on

काय आहे या व्हायरल फोटोमागचे सत्य?

जसलीन मथारूने शेअर केलेला फोटो केवळ तिच्या आगामी चित्रपट 'वो मेरी स्टुडंट है' याच्या प्रमोशनसाठी केले आहे. या चित्रपटात अनुप जलोटा आणि जसलीन मथारू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोन दिवसांपूर्वी जसलीने एक पोस्टर शेअर करुन अखेर शूटिंग सुरु झाले अशी माहिती दिली होती.

मात्र या फोटोने तिच्या चाहत्यांची मात्र झोप उडवली आहे. त्यामुळे अनेकांनी तर माझ्याशी लग्न केले असतेच तर, मुलांनो पैसे कमवा तर असं फळ मिळेल, आजकाल सर्वजण पैसा बघतात वय नाही अशा कमेंट्स या फोटोला दिल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2020 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).