Ankita Lokhande चा बाथटब व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; Watch Video
या व्हिडिओमध्ये चाहत्यांना तिचा हॉट अवतार पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीव्ही शो ते बॉलिवूडमध्ये काम करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. टीव्ही सीरियल 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अंकिताला घराघरात एक वेगळी ओळख मिळाली. अंकिता अभिनयाशिवाय सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते. ती दररोज सोशल मीडियावर आपली नवीन-नवीन छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. दरम्यान, अंकिताने आता तिचा एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांना तिचा हॉट अवतार पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अंकिता लोखंडे ने स्वतःचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता बाथटबमध्ये बसून बोल्ड लूक देताना दिसत आहे. अंकिता या व्हिडिओत वेगवेगळ्या पोझमध्ये दिसली आहे. त्याचवेळी तिने यावेळी मल्टीकलरचा शर्ट घातला आहे. तसेच अंकिताने आपल्या केसांची स्टाईल कुरळी ठेवली आहे. अंकिताचा हा व्हिडिओ सध्या खूपचं चर्चेत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ‘मुस्कुराना भी तुझी से सीखा है...' हे गाणे ऐकू येत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याचवेळी यावर भाष्य करून चाहते सतत आपला अभिप्राय देत आहेत. (वाचा - Radhe: Salman Khan आणि Disha Patani चे रोमँटिक गाणे ‘सीटी मार’ 'या' दिवशी होणार रिलीज)
याशिवाय अंकिताने तिचे काही ताजे छायाचित्रेही शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ती व्हाईट कलरच्या लाँग गाऊनमध्ये पोज देताना दिसत आहे. तिने व्हाईट कलरच्या गाऊनवर खास फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची किलर अदा तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे. तसेच अंकिताने केसांना स्टायलिश लूक दिला आहे. अंकिताच्या या फोटोंवर चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.