Anjali Arora Trolled: अंजली अरोराने क्रॉप टॉप परिधान करून बोल्ड अंदाजात फडकावला तिरंगा; ट्रोल्सनी कमेंट बॉक्समध्ये घेतला क्लास

ज्यामध्ये ती स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने परिधान केलेल्या आउटफिटमुळे अंजलीला ट्रोल करण्यात आलं आहे.

Anjali Arora (PC - Instagram)

Anjali Arora Trolled: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने होस्ट केलेल्या लॉकअप शोचा एक भाग असलेली अंजली अरोरा (Anjali Arora) नेहमी चर्चेत असते. अंजली अरोराचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने परिधान केलेल्या आउटफिटमुळे अंजलीला ट्रोल करण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये अंजली अरोरा पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि लो वेस्ट जीन्स घातलेली दिसत आहे.

हातात तिरंगा धरलेला अंजली अरोराचा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. मात्र, या व्हिडिओवरून तिला खूप ट्रोल केलं जात आहे. व्हिडिओवरील कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले की, 'ही तिरंगा दाखवत नाही, तर स्व:ला दाखवत आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान आहे.' एका युजर्सने लिहिले आहे, हा तर केवळ दिखावा झाला ना? (हेही वाचा - Salman Khan Tiger 3: भाईजानच्या Ek Tha Tiger ला आज 10 वर्ष पूर्ण तर टायगर 3 ची रिलीज डेट जाहीर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कंगना रनौतच्या शो लॉकअपचा एक भाग असलेल्या अंजली अरोरा हिने शो दरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले होते. शोमध्ये कंगना राणौतसोबत संभाषण करताना अंजली अनेकदा भावूकही झाली होती. या शोमध्ये तिने बराच पल्ला गाठला असला तरी या शोचा विजेता मुनव्वर फारूकी होता. हा शो वादांमुळे खूप चर्चेत होता.