Animal Worldwide Box Office Collection Week 3: रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ने जगभरात तीन आठवड्यांत केला 862 कोटींचा व्यवसाय
रणबीरसह या दोघांचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले आहे.
रणबीर कपूर स्टारर अॅक्शन थ्रिलर बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन 3 आठवडे झाले आहेत आणि चित्रपटाने आपली पकड कायम ठेवली आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अवघ्या तीन आठवड्यांत 862.21 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. टी-सीरीजने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ही माहिती शेअर केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमल 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रणबीर कपूरचा आजपर्यंतचा सर्वोत्तम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळाला. यासोबतच बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामुळे बॉबी देओल आणि तृप्ती प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. रणबीरसह या दोघांचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले आहे.
पाहा पोस्ट -