Amrish Puri Birth Anniversary: दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्या नायकापेक्षाही अधिक गाजलेल्या '5' खलनायकाच्या भूमिका

पाहूयात अमिरेश पुरी यांच्या 5 गाजलेल्या भूमिका

Amrish Puri (Photo Credits: YouTube)

चित्रपट म्हटला की नायकच महत्वाचा असतो असं म्हणणा-या लोकांना आपल्या अभिनयाच्या जोरावर नायकापेक्षा खलनायकाला महत्व देण्यास भाग पाडणा-या हरहुन्नरी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) यांची आज 88 वी जयंती. खलनायक म्हणून बॉलिवूडचा एक काळ गाजविणारे आणि नायकापेक्षा खलनायक म्हणूनअधिक काळ रुपेरी पडद्यावर अधिराज्य करणारे अमरीश पुरी आजही लोकांच्या स्मरणात कायम आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाने, कणखर आवाजाने भल्याभल्यांना घाम फोडणा-या या कलाकाराने बॉलिवूडला एक वेगळंच स्थान प्राप्त करुन दिलं. अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932 साली पाकिस्तानच्या लाहोर येथे झाला. अमरीश पुरी यांच्या खलनायकाच्या भूमिकेने त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले.

हिंदी चित्रपट तहलका मधील 'डाँग', मिस्टर इंडिया मधील 'मोगॅम्बो' या भूमिकेने आजही अनेकांचा थरकाप उडतो. पाहूयात अमिरेश पुरी यांच्या 5 गाजलेल्या भूमिका

1. मिस्टर इंडिया- मोगॅम्बो (Mogambo)

मिस्टर इंडिया चित्रपटातील मोगॅम्बो हे पात्र प्रेक्षकांसोबत लहान मुलांनाही प्रचंड भावले.

Mogambo (Photo Credits: YouTube)

2. तहलका- डाँग (Dong)

1992 मध्ये आलेल्या तहलका चित्रपटातीस अमरीश पुरी यांची 'डाँग' हे पात्र देखील प्रचंड गाजले.

3. नगीना- गारूडी भैरोंनाथ (Bhairavnath)

अभिनेत्री श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका असलेला नगीना चित्रपटातील गारूडीची भूमिका केलेले अमरीश पुरी आजही अनेकांच्या स्मरणार आहेत. 'मोगैंबो खुश हुआ': अमरीश पुरीची 87 वी जयंती- गुगलने साकारले अनोखे डूडल

Nagina Movie (Photo Credits: YouTube)

4. कोयला- राजा साहब (Raja Sahab)

शाहरूख खान आणि माधुरी दीक्षित यांची प्रमुख भूमिका असलेला कोयला चित्रपटातील अमरीश पुरी यांचे राजा साहब हे पात्र देखील प्रचंड प्रसिद्ध झाले.

5. नायक- बलराज चौहान (Balraj Chauhan)

अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या नायक या चित्रटातील अमरीश पुरी यांचे बलराज चौहान हे पात्र देखील बरेच चर्चेत आले होते.

12 जानेवारी 2005 मध्ये अमरीश पुरी यांचे निधन झाले. मात्र त्यांनी केलेल्या खलनायकाच्या भूमिका आजही अजरामर आहेत. अमरीश पुरीं सारखा खलनायक पुन्हा होणे नाही असेच यावेळी सांगावेसे वाटते.