Amitabh Bachchan Health Update: अमिताभ बच्चन यांची प्रकृती पूर्णपणे ठीक; ISPL फायनलमध्ये अँजिओप्लास्टीच्या अहवालाला म्हटलं 'फेक न्यूज'(Watch Video)
अमिताभ बच्चन शुक्रवारी रात्री मुंबई येथील स्टेडियममध्ये आयएसपीएलच्या अंतिम फेरीचे साक्षीदार होताना दिसले. पापाराझी विरल भयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेता हसताना आणि पॅप्सला शुभेच्छा देताना दिसत आहे. जेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तेव्हा, त्यांनी सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं.
Amitabh Bachchan Health Update: दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) शुक्रवारी रात्री माझी मुंबई आणि टायगर्स ऑफ कोलकाता यांच्यातील इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) फायनलमध्ये सहभागी होताना दिसले. यावेळी पापाराझींनी त्याच्या तब्येतीची चौकशी केली. त्यावर अमिताभ यांनी अँजिओप्लास्टी (Angioplasty) च्या बातम्यांना ‘फेक न्यूज’ (Fake News) असल्याचं सांगितलं. यावरून अमिताभ यांची तब्येत ठीक असल्याचं स्पष्ट होत आहे.
अमिताभ बच्चन शुक्रवारी रात्री मुंबई येथील स्टेडियममध्ये आयएसपीएलच्या अंतिम फेरीचे साक्षीदार होताना दिसले. पापाराझी विरल भयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेता हसताना आणि पॅप्सला शुभेच्छा देताना दिसत आहे. जेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तेव्हा, त्यांनी सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. तसेच अँजिओप्लास्टी संदर्भातील बातम्या ‘फेक न्यूज’ आहेत, असंही अमिताभ यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा - Amitabh Bachchan Hospitalised: अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल!)
दरम्यान, 15 मार्च रोजी अमिताभ बच्चन यांची मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. इंडियन स्ट्रीम प्रीमियर लीगदरम्यान अमिताभ यांच्यासोबत सचिन तेंडुलकरही दिसले. बिग बींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. फोटोत त्याच्यासोबत सचिन आणि अभिषेक दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “महान सचिन तेंडुलकरकडे क्रिकेटबद्दल असलेल्या ज्ञानाच्या संपत्तीने मी खूप प्रभावित झालो आहे. ISPL फायनल दरम्यान त्याच्यासोबत मौल्यवान वेळ घालवला.”
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते शेवटी 'गणपथ'मध्ये दिसले होते. हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट आपली जादू लोकांवर टाकण्यात अपयशी ठरला. भारतात केवळ 9.70 कोटी रुपयांच्या कमाईसह हा पिक्चर फ्लॉप झाला. त्यांचा पुढचा चित्रपट 'कल्की 2898 एडी' आहे, जो 9 मे रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)