Chehre Poster: अमिताभ बच्चन यांच्या चेहरे सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज; 'या' दिवशी टीझर होणार प्रदर्शित
या सिनेमात अमिताभ यांच्यासह इमरान हाशमी याची प्रमुख भूमिका आहे. दरम्यान, सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नवा सिनेमा 'चेहरे' (Chehre) सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमात अमिताभ यांच्यासह इमरान हाशमी (Emraan Hashmi) याची प्रमुख भूमिका आहे. त्याचबरोबर या सिनेमात रिया चक्रवर्ती ची वर्णी लागणार का? याबद्दलही साशंकता आहे. तिच्या सिनेमातील उपस्थितीवर निर्मात्यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. हा सिनेमा 30 एप्रिल रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झाली अूसन टीमकडून सिनेमाचे पोस्टर (Poster) रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये इमरान हाशमी सोबत अनु कपूर आणि क्रिस्टल डिसूजा देखील आहे.
अमिताभ बच्चन यांनी सिनेमाचे पोस्टर शेअर करताना लिहिले की, "चंद्र, चेहरे आणि हजारो गुपित. प्रत्येक चेहरा काहीतरी सांगतो आणि खूप काही लपवतो." चेहरे सिनेमा 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून 11 मार्च रोजी याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ('चेहरे' चित्रपटातून अभिनेत्री कृति खरबंदाचा पत्ता कट, 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी)
अमिताभ बच्चन ट्विट:
(हे ही वाचा: शस्त्रक्रियेनंतर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला लेटेस्ट फोटो; म्हणाले -' दृष्टीहीन आहे दिशाहीन नाही')
अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांचा एकत्रित असा हा पहिला सिनेमा असून रुमी जाफरी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' सिनेमा यावर्षी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी मोदी सरकारच्या अत्याचाराविरोधात भूमिका मांडावी अन्यथा महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता.