'अमिताभ बच्चन' दिसणार तृतीयपंथी च्या भूमिकेत? अक्षय कुमार, कियारा अडवाणी 'लक्ष्मी बॉम्ब'च्या निमित्ताने पुन्हा एकत्र
यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांच्या नावाचा एका वेगळ्या धाटणीच्या भूमिकेसाठी विचार करण्यात येत आहे. अक्षय कुमार आणि किआरा अडवाणी ही जोडी यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याचे देखील समोर आले आहे.
Laxmi Bomb New Movie: तामिळ चित्रपटांमध्ये (Tamil Movies) हिट ठरलेल्या 'कांचना' (Kanchana) सिनेमाचा हिंदी रिमेक 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmi Bomb) अक्षय कुमारने (Akshay Kumar) गपचूप शूटिंग सुरु केल्याचं समजतंय. या मध्ये लिडिंग लेडी म्ह्णून कियारा अडवाणीचं (Kiara Adwani) नाव ठरलं असून 'गुड न्युज' (Good News Movie) या आगामी सिनेमानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' संबंधित अनेक चर्चा आतापासूनच सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळतायत, विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं नाव सिनेमाच्या कास्ट सोबत जोडलं जातंय.
बॉलीवूडध्ये अँग्री यंग मॅन म्हणून आपल्या करिअरची सुरवात केलेले बिग बी लक्ष्मी बॉम्बच्या निमित्ताने तृतीयपंथीच्या (Transgender) भूमिकेत पाह्यला मिळणार असल्याचे देखील सांगितले जातेय. कांचना या मूळ सिनेमात ही भूमिका सारथनकुमार यांनी साकारली होती. Big B यांना बॉलिवूडमध्ये 50 वर्षे पूर्ण, 'या' मार्गाने मिळाला होता पहिला चित्रपट
काही दिवसांपूर्वी Deccan Chronicle ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना "मागील दीड वर्षांपासून मी आणि अक्षय आम्ही कांचना च्या रिमेक संदभात चर्चा करत होतो, यासाठी सध्या स्क्रिप्टवर काम चालू असून बॉलिवूड प्रेमींच्या आवडीला साजेसे असे काही बदल करण्यात येणार आहेत" अशी माहिती 'लक्ष्मी बॉम्ब'चे दिग्दर्शक 'राघव लॉरेन्स' यांनी दिली होती.याआधी लॉरेन्स यांनी तामिळ मधील मूळ चित्रपट कांचना मध्ये प्रमुख भूमिका व दिग्दर्शन केले होते.
या चर्चांवर अमिताभ बच्चन यांनी अजूनपर्यंत काही कमेंट केली नाहीये. चित्रपटाच्या मूळ स्क्रिप्ट नुसार या भूमिकेतील पात्राचा मृत्यू होऊन नंतर ते एका भुताच्या रूपात प्रेक्षकांसमोर येते. यापूर्वी भूतनाथ, भूतनाथ रिटर्न्स मधून अमिताभ यांनी एका आत्म्याची भूमिका साकारली होती मात्र तृतीयपंथी भूमिका साकारताना बीग बी कसे दिसतील याविषयी फॅन्स ना उत्सुकता लागली आहे.
याशिवाय अक्षय कुमारचा गुड न्यूज हा चित्रपट काहीच दिवसात बॉक्स ऑफिसवर धडक द्यायला सज्ज होणार आहे, तसेच 'द एंड' या वेब सीरिजने तो डिजिटल स्क्रीनवर देखील पदार्पण करणार आहे. तर अमिताभ यांचा 'बदला' सिनेमा बॉक्स ऑफिसवर नुकताच हिट झाला होता .