अमिताभ बच्चन यांनी इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासोबतचे फोटो शेअर करत ट्विटर वर दिले 'या' प्रश्नाचे उत्तर (See Photo)
अमिताभ बच्चन यांनी इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासोबतचे फोटो शेअर करत एक खास ट्विट केले आहे.
बॉलिवूड मधील दोन हरहुन्नरी कलाकार म्हणजेच इरफान खान (Irrfan Khan) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या दिवशी लागोपाठ समस्त जगाचा निरोप घेतला. या दोघांच्या जाण्याने अजूनही बॉलिवूड मध्ये शोककळा पसरलेली आहे. या दोघांसोबतच्या अनेक आठवणी, फोटो शेअर करून कलाकार मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सुद्धा एक खास ट्विट केले आहे. "आपल्याला ज्येष्ठ कलाकारापेक्षा तरुण कलाकाराच्या मृत्यूचे अधिक दुःख का होते? असा एक प्रश्न डोक्यात आला होता, कदाचित तरुण कलाकाराचा मृत्यू झाल्याने त्याला पुढे मिळू शकणाऱ्या संधी सुद्धा गमवाव्या लागतात त्यामुळे आपल्याला अधिक दुःख होते" अशा आशयाचे अमिताभ यांचे ट्विट आहे. या ट्विट सोबतच त्यांनी इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या सोबतचे फोटो सुद्धा जोडलेले आहेत. (Irrfan Khan Dies: इरफान खान यांना 'या' एका व्यक्तिसाठी जगायची इच्छा होती; शेवटच्या Interview मध्ये सांगितलेल्या गोष्टी वाचा)
इरफान खान आणि ऋषी कपूर हे दोघेही 2018 पासून कॅन्सरशी लढत होते. ऋषी कपूर यांना Lyukemenia तर इरफान खान याला Neuroendocrine Tumor चा आजार होता, मध्यंतरी या दोघांचीही प्रकृती बरीच सुधारली होती. मात्र अचानक तब्येतीत बिघाड आल्याने इरफान खान यांचा 29 एप्रिल रोजी तर ऋषी कपूर यांचा 30 एप्रिल रोजी मृत्यू झाला. इरफानचे वय 54 वर्ष तर ऋषी कपूर यांचे वय 67 वर्ष होते. दोघांचेही जाणे तितकेच चटका लावून जाणारे होते मात्र इरफानला आयुष्यातील पुढील संधी गमवाव्या लागल्या याचे अधिक दुःख होत आहे अशा आशयाच्या भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केल्या आहेत.
अमिताभ बच्चन ट्विट
दरम्यान, सध्या सुरु असणाऱ्या लॉक डाऊन काळात या दोघांचेही अंत्यविधी अगदी साध्या पद्धतीने करण्यात आले, फार गर्दी न करता केवळ कुटुंबियांच्या हजेरीतच हे अंत्यविधी झाले त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही, त्यांना नीट अलविदा सुद्धा करता आले नाही असे दुःख अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले होते.