अमिताभ बच्चन यांनी अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या सोबतचा खास फोटो शेअर करत कोविड-19 संसर्गातून बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे मानले आभार (View Tweet)

यासाठी त्यांनी स्वतःसह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याचा फोटो शेअर केला आहे.

Amitabh Bachchan, Abhishek, Aishwarya and Aaradhya (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पुन्हा एका रुग्णालयातून एक खास पोस्ट केली आहे. कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापूर्वी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान बिग बी (Big B) रुग्णालयातून सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांशी संपर्कात राहत आहेत. आता पुन्हा त्यांनी एक खास ट्विट केले आहे. त्यात त्यांनी कोविड-19 संसर्गातून बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे कुटुंबियांतर्फे आभार मानले आहेत. यासाठी त्यांनी स्वतःसह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याचा फोटो शेअर केला आहे.

या खास ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले, "आम्ही तुमचे प्रेम बघत आहोत...तुमच्या प्रार्थना ऐकत आहोत... त्यामुळे कृतज्ञता आणि आभारासाठी आम्ही आमचे हात जोडले आहेत..." यापूर्वीही बिग बी यांनी डॉक्टरांचे, चाहत्यांचे आभार मानणारे ट्विट केले होते. (कोविड-19 पॉझिटिव्ह ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांना 'या' कारणांसाठी केले रुग्णालयात दाखल)

Amitabh Bachchan Tweet:

यापूर्वी चाहत्यांचे आभार मानण्यासाठी बिग बी यांनी केलेले ट्विट.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याची पहिली वेबसिरीज Breathe Into the Shadows अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली. तर अमिताभ बच्चन लवकरच 'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय टीव्ही शो होस्ट करणार आहेत. तसंच 'ब्रह्मास्त्र' आणि 'चेहेरे' या सिनेमातूनही बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.