Ameen Sayani Passes Away: अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन; भारतीय रेडिओवरील लोकप्रिय आवाज हरपला
अमीन सयानी यांनी जवळपा 19 हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये झाली होती. रेडिओवर 1952 साली सुरु झालेल्या 'गीतमाला' या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले.
रेडिओचा आवाज आणि रेडिओ किंग अशी ओळख असणाऱ्या अमीन सयानी (Ameen Sayani) यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी वडिलांच्या निधनाविषयी माहिती दिली. अमीन सयानी यांनी बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांचे निधन झाले. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपला आहे. (हेही वाचा - Fali S Nariman Passes Away: ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरीमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन)
अमीन सयानी यांनी जवळपा 19 हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये झाली होती. रेडिओवर 1952 साली सुरु झालेल्या 'गीतमाला' या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास 65 हजार पत्रं यायची.
अमीन सयानी यांना मागील काही वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. आज सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2024 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

