Alia Bhatt: करिअरच्या पीकवर असताना अभिनेत्री आलिया भट्ट कामातून घेणार तब्बल एक वर्षाचा ब्रेक
म्हणजेच आलिया एक वर्ष कुठलाही नवा सिनेमा साईन करणार नसून ती साईन केलेल्या सिनेमांमध्ये कामही नाही करणार आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिची प्रेगनंन्सी (Pregnancy) एन्जॉय (Enjoy) करत आहे. गरोदरपणात सिनेमाचं प्रमोशन (Promotion) करणं, अवॉर्ड फंक्शन्सला (Award Show) हजेरी लावणं, पत्रकार परिषदा (Press Conference) घेणं हे करणारी कदाचित अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री असावी. आलिया खऱ्या अर्थाने तिची प्रेगनंन्सी ऐन्जॉय करतेय असं कौतुक आलियाचे फॅन्स करतात. आलिया सध्या बॉलिवूड मधील टॉपच्या हिरोईन्स (Heroins) पैकी एक आहे. कमी वयात आलियाने मोठं यश मिळवून आता ती करियरच्या पीकवर असली तरी आलिया आपल्या कामातून तब्बल एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. म्हणजेच आलिया एक वर्ष कुठलाही नवा सिनेमा साईन करणार नसून ती साईन केलेल्या सिनेमांमध्ये कामही नाही करणार आहे. कारण आलिया लवकरचं आई होणार आहे. आपल्या बाळाला जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
अभिनेत्री आलियासह पती रणबीर कपूर (Actor Ranbir Kapoor) देखील आपल्या करिअर मधून वेळ काढून आपल्या पत्नीसह बाळाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे. रणबीर आलिया सध्या आतुरतेने आपल्या बाळाची वाट बघत आहे. दोघही पेरेंटहूड (Parent Hood) ऐंजॉय करण्यासाठी सज्ज आहेत असं त्यांनी त्यांच्या बऱ्याचं मुलाखतीत (Interview) सांगितलं आहे. (हे ही वाचा:- Mili Trailer Out: मायनस डिग्री तापमानात जीवनाची लढाई लढताना दिसली जान्हवी कपूर; अभिनेत्रीच्या 'मिली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, Watch Video)
आलियाने तिच्या आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' आणि करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमांचं शूटिंग पूर्ण केलं आहे. नुकताच आलियाचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मंडळींसोबत हा कार्यक्रम पार पडला आहे. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.