Alia Bhatt Photos Leak: "तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात..." खासगी फोटो काढणाऱ्यांवर आलिया संतापली
अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या सोशल मिडीयाच्या पोस्टमधून पापाराझी कल्चरवर संताप व्यक्त केला आहे
अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo) झाले आहेत. यामुळे तिने पापाराझी कल्चरवर संताप व्यक्त केला आहे. आलिया भट्टने नुकतंच इन्स्टाग्रामवर (Instagram Post पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. त्याबरोबरच आलियाने संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक गोष्टीला एखादी मर्यादा असते आणि आता तुम्ही त्या सर्व मर्यादा पार केले असल्याचे आलियाने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे. या पोस्टमध्ये आलियाने पोलिसांना देखील टॅग केले आहे.