Alia Bhatt ची मैत्रिण Rhea Khurana च्या लग्नात धूम; 'Genda Phool' गाण्यावर केला धमाकेदार डान्स (Watch Video)
अलिकडेच आलियाने रिया खुराना या आपल्या मैत्रिणीच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या लग्नसोहळ्यात आलियाने फ्रेंड्ससोबत भरपूर धमाल केली असून आपल्या गर्लगँग सोबत डान्सही केला.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या आपल्या फ्रेंड्स सोबत एन्जॉय करत आहे. अलिकडेच आलियाने रिया खुराना (Rhea Khurana) या आपल्या मैत्रिणीच्या विवाहसोहळ्याला (Wedding) हजेरी लावली. या लग्नसोहळ्यात आलियाने फ्रेंड्ससोबत भरपूर धमाल केली असून आपल्या गर्लगँग सोबत डान्सही केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. (Alia Bhatt Hot Bikini Photos: आलिया भट्ट चे हॉट बिकिनी फोटोज; मालदीव मध्ये घेतेय सुट्टीचा आनंद)
हा डान्स व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, आलिया आपल्या फ्रेंड्स सोबत बादशाह सिनेमाच्या 'गेंदा फूल' (Genda Phool) या हिट सॉन्गवर थिरकत आहे. तिच्या आकर्षक नृत्याने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
पहा व्हिडिओ:
आलियाचा लग्नसोहळ्यासाठी छान नटली असून तिचा सुरेख अंदाज तुम्ही या फोटोत पाहू शकाल. दरम्यान, आलियाची मैत्रिण रिया खुराना ही पेशाने इंटिरियर डिझाइनर असून तिचा स्वतःचा ‘रिअररेंज होम’ नावाचा इंटिरियर ब्रँड आहे.
पहा फोटोज:
बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि 'गंगुबाई काठियावाड़ी' सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आलियाने स्वत:ला क्वारंटाईन केले होते. मात्र तिचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर तिने पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे.