Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्ट इस्पितळात दाखल, लवकरच होणार जुनिअर कपूरचे आगमन
अभिनेता रणबीर कपूर पत्नी आलिया भट्टसह मुंबईतील सुप्रसिध्द इस्पितळ रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
बॉलिवुडचं रोमॅटिंक कपल (Bollywood Romantic Couple) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरचं गोड बातमी देणार आहे. कपूर परिवारातील पाचव्या पिढीचं स्वागत करण्यासठी कपूर कुटुंब उत्साहात आहेत. तरी लवकरच रणबीर-आलिया गोड बातमी देणार ही शक्यता नाकारता येणार नाही कारण अभिनेता रणबीर कपूर पत्नी आलिया भट्टसह मुंबईतील सुप्रसिध्द इस्पितळ रिलायन्स हॉस्पिटलमध्ये (Reliance Hospital) दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. तरी कपूर परिवारकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण रणबीर आलियाच्या भल्या सकाळी दवाखाण्यात दाखल होण्यान चर्चेला उधाण आलं आहे. तरी आलिया रणबीरच्या बाळाची उत्सुकता संपूर्ण बॉलिवूडला (Bollywood) लागली आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचं वर्षी १४ एप्रील रोजी लग्नबंधनात अडकले. तर जूनमध्ये सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो पोस्ट करत आपल्या घरी छोटा पाहूणा येणार असल्याची माहिती अलिया भट्टने दिली. तरी लग्न एप्रिलमध्ये आणि बाळ नोव्हेंबर मध्ये यावरुन रणबीर आलियाच्या फॅन्समध्ये चर्चेला उधाण आलं आहे. तरी लग्नापूर्वीच अभिनेत्री आलिया गरोदर असल्याची चर्चा देखील सोशल मिडीयावर नेहमी होताना दिसते. (हे ही वाचा:- Priyanka Chopra at Mumbai: तब्बल तीन वर्षानंतर भारतात परतलेल्या देसी गर्लचा आनंद गगनात मावेना, माहेरवाशीन प्रियंका चोप्राचा मुंबईत फेरफटका)
आलिया भट्ट (Alia Bhatt) ही बॉलिवूडमधील (Bollywood) त्या अभिनेत्रींपैकी आहे जी गर्भधारणेनंतर ही सतत कामात, रिअलिटी शो (Reality Show) किंवा सिनेमा प्रमोट (Movie Promotion) करताना दिसली. तसेच तिच्या गरोदरपणातील पोशाख, पादत्राणे आणि प्रसूती पोशाखांची स्वतःची लाइन सुरू करण्यापर्यंत, अभिनेत्री तिच्या गरोदरपणाची प्रशंसा करण्यात आणि प्रचारात्मक कार्यक्रम किंवा पुरस्कार समारंभांमध्ये याबद्दल ती कायम मोकळेपणाणे बोलताना दिसली. अभिनेत्री आलिया भट्टने तिची प्रेग्नंसी उत्साहात एन्जॉय केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)