Pan Masal Ad: Akshay Kumar ने Ajay Devgn, SRKसोबत पुन्हा केली पान मसाल्याची जाहिरात, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलं अभिनेत्याला ट्रोल

हा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. एका यूजरने लिहिले की, "हे पॅन इंडियाचे स्टार नाहीत." तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "अक्षय कुमार पैशासाठी काहीही करू शकतो." दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, "पैशाच्या भुकेने अक्षयचा चित्रपट फ्लॉप होत आहे."

Vimal Pan Masal Ad (PC - Twitter)

Pan Masal Ad: पान मसाला ब्रँड विमल (Vimal) च्या नवीन जाहिरातीसाठी अक्षय कुमार (Akshay Kumar) शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अजय देवगण (Ajay Devgan)सोबत पुन्हा एकत्र आला आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री-मॉडेल सौंदर्या शर्मासह तीन सुपरस्टार दिसत आहेत. या जाहिरातीमध्ये शाहरुख आणि अजय अक्षयच्या घराजवळील रस्त्यावर कारमध्ये बसून त्याची वाट पाहत आहेत. ते कारचा हॉर्न वाजवून त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हेडफोन घातलेल्या अक्षयला आवाज जात नाही. त्यानंतर शाहरुख त्याच्या काचेच्या खिडकीकडे बॉल फेकतो. पण दुर्दैवाने तो त्याच्या शेजारी असलेल्या सौंदर्याच्या खिडकीवर आदळतो. अनेक कॉल्सकडे दुर्लक्ष केल्यावर, अजय पान मसाल्याचे पॅकेट उघडून ते खातो. विमलच्या वासाने अक्षय कुमारचं लक्ष शाहरुख आणि अजयकडे जाते. त्यानंतर तो लगेचं खाली जातो.

हा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. एका यूजरने लिहिले की, "हे पॅन इंडियाचे स्टार नाहीत." तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "अक्षय कुमार पैशासाठी काहीही करू शकतो." दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, "पैशाच्या भुकेने अक्षयचा चित्रपट फ्लॉप होत आहे." (हेही वाचा -Gadkari Teaser: केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'गडकरी' सिनेमाचा टीझर जारी (Watch Video))

अक्षय कुमारने 2022 मध्ये विमलचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्याच्या चाहत्यांच्या मोठ्या प्रतिक्रियेला तोंड देत पद सोडले. 'OMG 2' अभिनेत्याने नंतर तंबाखूच्या ब्रँडशी स्वतःला जोडल्याबद्दल माफी मागितली. अक्षयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, "मला माफ करा. मी तुमची, माझे सर्व चाहते आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमचा प्रतिसाद मला खूप भावला आहे. मी तशा जाहिरीत कधी केल्या नाही आणि यापुढेही करणार नाही. विमल इलायची (sic) सोबतचा माझा संबंध पाहता तुमच्या भावनांचा मी आदर करतो."

त्याने पुढे म्हटलं होतं की, सर्व नम्रतेने, मी पद सोडले आहे. मी एका योग्य कारणासाठी संपूर्ण समर्थन शुल्काचे योगदान देण्याचे ठरवले आहे. ब्रँड माझ्यावर बंधनकारक असलेल्या कराराच्या कायदेशीर मुदतीसाठी जाहिराती प्रसारित करणे सुरू ठेवू शकतो. परंतु, मी माझ्या भविष्यातील निवडी करताना खूप सावधगिरी बाळगण्याचे वचन देतो. त्या बदल्यात मी नेहमीच तुमचे प्रेम आणि शुभेच्छा मागतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now