खिलाडी अक्षय कुमार ने पत्नी ट्विंकल खन्नासाठी आणले कांद्याचे झुमके; मजेशीर पोस्ट करत अभिनेत्री ने सांगितले यामागचे कारण

जेव्हा ट्विंकल खन्ना हे पाहिले तेव्हा तिला हसावे की रुसावे हे काही कळत नव्हतं. मात्र नव-याच्या या अनोख्या अंदाजाचे तिने इन्स्टाग्राम वरुन कौतुक केले आहे.

Onion Earrings (Photo Credits: Instagram)

कांद्याचे वाढते दर पाहता सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर दिवसा तारे चमकायला लागले आहेत. या महागाईची झळ न केवळ सामान्यांना तर सिनेतारकांपर्यंत पोहोचू लागली आहे. याचे ताजं उदाहरण म्हणजे खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सोनी वाहिनीवरील कपिल शर्मा शो मध्ये आपल्या आगामी चित्रपट 'गुड न्यूज' (Gud News) च्या प्रमोशन साठी गेला असता त्याने एक खास गोष्ट आपल्या पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) साठी आणली. ही वस्तू मुळात या चित्रपटातील अभिनेत्री करिना कपूर हिला या शो च्या टीमकडून देण्यात आली होती. मात्र तिला ती जास्त न आवडल्याने अक्षय ती गोष्ट आपल्या पत्नीसाठी घेऊन गेला.

ही वस्तू म्हणजे कांद्याचे झुमके आहेत. जेव्हा ट्विंकल खन्ना हे पाहिले तेव्हा तिला हसावे की रुसावे हे काही कळत नव्हतं. मात्र नव-याच्या या अनोख्या अंदाजाचे तिने इन्स्टाग्राम वरुन कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

My partner returns from performing at the Kapil Sharma show and says, ‘They were showing this to Kareena, I don’t think she was too impressed, but I knew you would enjoy them so I got them for you.’ Sometimes it’s the smallest things, the silliest things that can touch your heart. #onionearrings #bestpresentaward

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

हेदेखील वाचा- Good Newwz Trailer: 'Sperm' ची अदलाबदली, 'Pregnancy' ड्रामा दाखवत खळखळून हसवणारा गुड न्यूज सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; अक्षय-करीना, दिलजीत-कियाराच्या जोडीने घातलाय धुमाकूळ (Watch Video)

त्यात तिने असे म्हटले आहे की, 'अक्षय जेव्हा मला हे झुमके घेऊन येत होता तेव्हा त्याला खात्री होती की ते मला नक्की आवडतील. कधी कधी छोट्या छोट्या आणि खट्याळ गोष्टीही किती आनंद देऊन जातात.'

Sakhi Gokhale - Suvrat Joshi यांचं नवं कपल गोल; दोघांनीही गोंदवला सारखाच टॅटू!Watch Video

अक्षय कुमार चा आगामी चित्रपट 'गुड न्यूज' येत्या 27 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह करीना कपूर, कियारा आडवाणी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसतील.