Lockdown In India: लॉकडाऊन काळात बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना ला घेऊन रुग्णालयात पोहचला; पहा व्हिडिओ

सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, लॉकडाऊन काळात बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना ला घेऊन रुग्णालयात पोहचला आहे. सध्या सोशल मीडियावर अक्षय आणि ट्विंकल खन्नाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना (Photo Credits: Instagram)

Lockdown In India: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, लॉकडाऊन काळात बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना ला (Twinkle Khanna) घेऊन रुग्णालयात पोहचला आहे. सध्या सोशल मीडियावर अक्षय आणि ट्विंकल खन्नाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून अक्षयच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण, लॉकडाऊन असताना अक्षय स्वत: गाडी चालवत ट्विंकलने हॉस्पीटलमध्ये घेऊन जात आहे. त्यामुळे ट्विंकलला नेमकी काय झालं आहे? असा प्रश्न अक्षयच्या चाहत्यांना पडला आहे. परंतु, या सर्व प्रकारानंतर ट्विंकलने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus: अभिनेता अक्षय कुमार याच्याकडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर PM-Cares Fund साठी 25 कोटींची मदत)

 

View this post on Instagram

 

Deserted roads all the way back from the hospital. Please don’t be alarmed, I am not about to kick the bucket because I really can’t kick anything at all! #sundayshenanigans

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

या ट्विटमध्ये ट्विंकलने सांगितलं आहे की, ‘मी आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मला कोरोनाची लागण झालेली नाही. माझ्या पायाचं हाड मोडल्यानं आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. सध्या मुंबईचे सर्व रस्ते जवळपास रिकामे आहेत. तसचं आमच्या ड्रायव्हरला सुट्टी असल्याने आज अक्षय माझा ड्रायव्हर बनला आहे.’

ट्विंकल खन्नाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, अक्षय कुमारने कोरोना विरोधातील लढाईसाठी पीएम केअर्स फंडसाठी 25 कोटींची मदत जाहीर केली. त्यानंतर ट्विंकलने आपल्या ट्विटर हँडलवरू अक्षयचं कौतुक केलं. यात ती म्हणाली होती की, ‘मला माझ्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटतो. जेव्हा मी त्याला विचारलं की, तु खरंच एवढी मोठी रक्कम दान करणार आहेस का? त्यावर त्याने उत्तर दिलं, जेव्हा मी सुरुवात केली होती, त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हतं. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे अशा वेळी मी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काहीतरी देत असताना मागे-पुढे का पाहावं?' त्याच्या या उत्तराने ट्विंकलचं काय अख्या महाराष्ट्राचा उर भरून आला.