Ajay Devgn's Brother Anil Devgan Passes Away: अजय देवगणचा लहान भाऊ अनिल देवगण याचे निधन; 'राजू चाचा' चित्रपटाचे केले होते दिग्दर्शन
2020 साल हे गेल्या अनेक वर्षांमधील सर्वाधिक वाईट वर्षे ठरले, असे म्हणायला काही हरकत नाही. या वर्षी कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीसोबत लढत असताना अनेक दिग्गज लोकांना आपण गमावले आहे. यावर्षी चित्रपटसृष्टीमधील तर अनेक सितारे आपल्याला सोडून गेले
2020 साल हे गेल्या अनेक वर्षांमधील सर्वाधिक वाईट वर्षे ठरले, असे म्हणायला काही हरकत नाही. या वर्षी कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीसोबत लढत असताना अनेक दिग्गज लोकांना आपण गमावले आहे. यावर्षी चित्रपटसृष्टीमधील तर अनेक सितारे आपल्याला सोडून गेले. आता अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याच्या भावाचे निधन झाले असल्याची माहिती मिळत आहे. अजय देवगण याचा भाऊ अनिल देवगण (Anil Devgan), वय 45 यांचे काल रात्री निधन झाले. स्वतः अजय देवगणने ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. अनिल देवगण यांनी ‘राजू चाचा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
आपल्या ट्वीटमध्ये अजय देवगण म्हणतो, ‘काल रात्री माझा भाऊ अनिल देवगन याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. एडीएफएफ आणि मला त्याची नेहमीच आठवण येत राहील. त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा. सध्याच्या कोरोना विषाणू साथीच्या काळात आमच्याकडे वैयक्तिक प्रार्थना सभा होणार नाही.’
अजय देवगण ट्वीट -
27 जून 1975 रोजी मुंबईमध्ये अनिल देवगण यांचा जन्म झाला होता. अनिल यांना संगीताची विशेष आवड होती. त्यांनी तबला आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले होते. 1989 मध्ये भगत सिंह कॉलेज, नवी दिल्ली येथून पदवी संपादन केल्यानंतर, अजय देवगणने प्रोत्साहन दिल्याने त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी सुनील अग्निहोत्री, अनीस बज्मी आणि राज कंवर अशा दिग्दर्शकांचे सहाय्यक म्हणून काम पहिले. (हेही वाचा: 'चलते चलते' फेम जेष्ठ अभिनेते विशाल आनंद यांचे दीर्घ आजाराने निधन)
अनिल यांनी 1996 च्या 'जीत' या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. अजय देवगणच्या 'जान', 'प्यार तो होना ही था', 'इतिहास' या चित्रपटातही सहायक म्हणून काम केले. शेवटी 2020 मध्ये ‘राजू चाचा’द्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी हाल-ए-दिल व ब्लॅकमेल या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. दरम्यान कालच बातमी मिळाली होती की, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विशाल आनंद (Vishal Anand) यांचे दीर्घ आजाराने 4 ऑक्टोबर रोजी निधन झाले. विशाल आनंद हे त्यांच्या 'चलते चलते' (Chalte Chalte) चित्रपटातील भूमिकेसाठी लोकप्रिय होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)