De De Pyaar De Song Chale Aana: 'दे दे प्यार दे' सिनेमातील अजय देवगन आणि रकुल प्रीत सिंग यांचा इमोशनल ट्रॅक 'चले आना' आऊट! (Video)

अजय देवगन आणि रकुल प्रीत सिंग स्टारर 'दे दे प्यार दे' (De De Pyaar De) सिनेमातील एक रोमँटीक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Ajay Devgn and Rakul Preet singh in Chale Aana Song from De De Pyaar De (Photo Credits: YouTube)

अजय देवगन (Ajay Devgan) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) स्टारर 'दे दे प्यार दे' (De De Pyaar De) सिनेमातील एक भावूक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चले आना (Chale Aana) असे या गाण्याचे बोल असून हे गाणे अरमान मलिक (Armaan Malik) याने गायले आहे. कुणाल वर्मा (Kunaal Vermaa) याने हे गाणे लिहिले असून अरमान मलिक आणि डबू मलिय यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. अजय देवगन आणि रकुल प्रीत सिंग यांच्यातील भावनिक नाते दाखवणारे हे गाणे प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरले.

पहा गाणे:

दे दे प्यार दे या सिनेमात अजय देवगण, रकुल प्रीत सिंग यांच्याशिवाय तब्बू देखील प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात अजय देवगण आशिष नावाच्या 50 वर्षे वय असलेल्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारत असून रकुल आयेशा नावाच्या 26 वर्षांच्या मुलीची भूमिका करत आहे. तर तब्बू अजयच्या एक्स व्हाईफची भूमिका करत आहे. या दोघांनाही दोन मुले असून ती आयेशाच्या वयाची आहेत. त्यामुळे सिनेमाचे कथानक नक्की काय सांगू इच्छिते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अजय, रकुल, तब्बू यांच्या शिवाय या सिनेमात अलोकनाथ, जावेद जाफरी आणि जिमी शेरगील यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अकिव अली यांचा हा दिग्दर्शनातील पहिलाच प्रयत्न आहे. 17 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.