Coronavirus Pandemic विरुद्ध लढण्यासाठी अजय देवगन आणि ऋतिक रोशन यांचे COVID-19 Survivors ना रक्तदान करण्याचे आवाहन
त्यासाठी सरकार, आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेत बॉलिवूड सेलिब्रिटी अजय देवगण आणि ऋतिक रोशन यांनी कोरोनातून मुक्त झालेल्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
भारतात फैलावात असणारा कोरोना व्हायरसचा विस्तार पाहता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. 'घरी राहणे' हा कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्याचा एकमेव मार्ग आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या विस्तारासह कोरोना विरुद्धचा लढा अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार, आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोरोनातून मुक्त झालेल्यांनी रक्तदान करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांच्या रक्तातील Antibodies कोरोना विरुद्ध लढण्यास सक्षम आहेत. म्हणूनच बॉलिवूड सेलिब्रिटी अजय देवगण (Ajay Devgn) आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) यांनी कोरोनातून मुक्त झालेल्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. (कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांना Fight Against Coronavirus मध्ये सहभागी होण्याची संधी; रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी BMC कडून खास Email ची सोय)
अजय देवगण याने यासाठी खास ट्विट केले आहे. त्यात त्याने लिहिले की, "कोरोना व्हायरस संसर्गातून मुक्त झालेल्या आणि कोरोना वॉरिअर असलेल्यांनी कोरोना या अदृश्य दुश्मनला हरवण्यासाठी पुढे या. कारण तुमच्या रक्तात अशी बुलेट आहे जी या व्हायरसला मारु शकेल. त्यामुळे कृपया रक्तदान करा. त्यामुळे अधिकाधिक रुग्ण विशेषतः गंभीर प्रकृती असलेले रुग्ण ठीक होऊ शकतील."
Ajay Devgn Tweet:
ऋतिक रोशन ने देखील ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले की, "कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एक मिशन सुरु आहे. कोरोनामुक्त झालेले कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत करु शकतात. जर तुम्ही कोरोनामुक्त होऊन 14 दिवस झाले आहेत किंवा तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर 14 दिवसांनी तुम्ही रक्तदान करु शकता. तुमच्या रक्तातील पेशी कोरोना व्हायरसला मारण्यास सक्षम आहेत. अशावेळी जर तुम्ही रक्तदान केले तर तुम्ही अधिकाधिक लोकांना वाचवू शकता. विशेषतः गंभीर प्रकृती असलेले रुग्ण."
Hrithik Roshan Tweet:
कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी सक्रीय सहभाग दर्शवला आहे. आर्थिक मदत करत सुरक्षित राहण्याचे आवाहनही कलाकारांनी वारंवार केले आहे. आता पुन्हा एकदा प्लाझ्मा थेरपीला प्रोत्साहन देत अजय देवगण आणि ऋतिक रोशन यांनी हे आवाहन केले आहे.