दिवंगत वीरु देवगण यांच्यासोबत असलेला हा चिमुकला आहे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अॅक्शन हिरो, ओळखलत का?
Veeru Devgan And Ajay Devgan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे फाइट मास्टर म्हणून ओळखले जाणारे वीरु देवगण (Veeru Devgan) यांना अलीकडेच देवाज्ञा झाली. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबियांसोबत संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. यावेळी त्यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण (Ajay Devgan) याने आपल्या बाबांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याचे आणि त्यांच्या बाबांचे बाप-लेक इतकेच गुरु-शिष्याचेही नाते होते. त्यांच्यात बरेच साम्यही होते. ज्याची झलक पाहायला मिळणारा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत दिवंगत वीरू देवगण यांच्यासोबत एक चिमुकला दिसत आहे. हा चिमुकला दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द अजय देवगणच आहे. पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

Such a cool classic picture of #ajaydevgan with his guru his late father 🙏

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या फोटोमध्ये अजय आणि त्याचे बाबा वीरु देवगण यांच्यातील साम्य अगदी स्पष्ट दिसून येत आहे. तसेच या अजयचे या निरागस चेह-यावरील भावही त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा- तानाजी सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात; अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या मुख्य भूमिकेत

अजय देवगण सध्या ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता अजिंक्य देवही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.