बिग बी अमिताभ बच्चन यांना COVID-19 ची प्राथमिक लक्षणे आढळली असून प्रकृती स्थिर, कोविड योद्धांचे मानले विशेष आभार, Watch Video
तसेच त्यांच्यासह देशभरातील कोविड योद्धांना देवाची उपमा देत ते करत असलेल्या महान कार्याचे कौतुक केले आहे.
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना (Amitabh Bachchan) COVID-19 ची लागण झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. बिग बी सोबत ज्युनिअर बी अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला देखील कोरोनाची लागण झाली असून दोघांनाही काल रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे या दोघांनाही याबाबत सोशल मिडियावर माहिती 'काळजी करु नका' असा संदेश आपल्या चाहत्यांना दिला. ANI ने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याचे नानावटीच्या जनसंपर्क कार्यालयाने सांगितले आहे. सध्या त्यांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. या दरम्यान बिग बींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.
अमिताभ बच्चन यांनी नानावटीच्या डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व कर्मचा-यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांच्यासह देशभरातील कोविड योद्धांना देवाची उपमा देत ते करत असलेल्या महान कार्याचे कौतुक केले आहे. Big Breaking: अमिताभ बच्चन यांच्यानंतर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनलादेखील कोरोना विषाणूची लागण
पाहा व्हिडिओ:
त्यासोबतच माझी प्रकृती स्थिर नानावटीतील कर्मचारी माझी नीट काळजी घेत आहेत. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करु नका, असा संदेशही त्यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे.
याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या बच्चन, जया बच्चन याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असेही बिग बींनी सांगितले आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. अमिताभ यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर काही वेळातचं अमिताभ यांनी स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.