Uorfi Javed New Video: उर्फी जावेदचा नवा लूक पाहून लावालं डोक्याला हात, व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटीझन्सनी दिल्या खतरनाक प्रतिक्रिया, Watch

उर्फी जावेदचा हा लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. काहीजण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हनुमान चालिसाचे पठण करतानाही दिसले. एका यूजरने लिहिले की, 'आता मी रात्री झोपू शकणार नाही.'

Uorfi Javed New Video: उर्फी जावेदचा नवा लूक पाहून लावालं डोक्याला हात, व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटीझन्सनी दिल्या खतरनाक प्रतिक्रिया, Watch
Uorfi Javed New Video (PC - Instagram)

Uorfi Javed New Video: उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या फॅशनमुळे नेहमीचं चर्चेत असते. उर्फी आज तिच्या फॅशनमुळे ग्लॅमर जगतात एक प्रसिद्ध नाव बनली आहे. तिच्या अनोख्या शैलीने आश्चर्यचकित करणे उर्फी जावेदचा व्यवसाय बनला आहे. आता अभिनेत्रीने तिच्या अलीकडच्या अवताराने चाहत्यांना घाबरवले आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनपासून उर्फी जावेदचा फॅशन गेम सुरू झाला आहे. रिअॅलिटी शोमध्ये या अभिनेत्रीने तिच्या अनोख्या स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

फॅशनिस्टा उर्फी जावेदने सोशल मीडियावर तिचा नवा लूक दाखवला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये अभिनेत्री धोकादायक लूकमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मला माझ्या आत असलेल्या सैतानला बाहेर काढायचे आहे.' (हेही वाचा -Nagabhushan Rammed Car Into Couple: कन्नड अभिनेता नागभूषणने जोडप्याला दिली कारने धडक; महिलेचा मृत्यू, अभिनेत्याला अटक)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

क्लिपमध्ये उर्फी जावेद आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक आणि अनोख्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने ब्रॅलेटशिवाय ब्लेझर असलेली पॅंट घातली आहे. उर्फीने सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे. उर्फीने केसांची स्टाईलही वेगळ्या पद्धतीने केली आहे. एकंदरीत उर्फीचा हा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

उर्फी जावेदचा हा लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. काहीजण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हनुमान चालिसाचे पठण करतानाही दिसले. एका यूजरने लिहिले की, 'आता मी रात्री झोपू शकणार नाही.' एकाने लिहिले, 'मी शपथ घेतो की तू खूप वाईट दिसत आहेस.' दुसऱ्या एका युजर्सने म्हटलं आहे की, 'पाताळ लोकांची अप्सरा.'

(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2023 01:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).