BMC च्या FIR पाठोपाठ FWICE ची Gauahar Khan ला नॉन कोऑपरेशन ची नोटीस; अभिनेत्री च्या टीम कडून सारे नियम पाळत असल्याची दिली माहिती
सध्या गौहर ज्या शूटिंगमध्ये सहभागी झाली होती ते थांबवण्यात आले असून कलाकार आणि क्रू मेंम्बर्स यांना क्वारंटीन करण्यात येणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) च्या विरूद्ध बीएमसी ने कोविड 19 नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एक एफआयआर नोंदवल्यानंतर आता द फेडरेशन ऑफ वेर्स्टन इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE)कडून देखील एक नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान बीएमसीने काल मुंबईच्या ओशिवारा पोलिस स्टेशन मध्ये गौहर कोरोना पॉझिटीव्ह असताना देखील नियमांचं उल्लंघन करत बाहेर फिरताना आणि शूटिंग करताना आढळल्याचे आरोप लावले आहेत. यावरूनच आता FWICE ने गौहरला 2 महिन्यांसाठी नॉन कोऑपरेशनची नोटीस बजावली आहे. Gauahar Khan: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खान विरोधात गुन्हा दाखल.
FWICE चे प्रेसिडंट बी एम तिवारी यांनी मीडीयाला दिलेल्या माहितीनुसार, 'गौहर खान बेजबाबदार पणे वागली आहे. तिने केवळ स्वतःचं आरोग्य पणाला लावलेले नाही तर शूटिंगला येऊन इतरांचे आरोग्य देखील धोक्यात आणले आहे. त्यामुळे तिला नॉन कोऑपरेशनची नोटीस पाठवली जात आहे. पण गौहर खानच्या टीम कडून या प्रकरणी तिची बाजू मांडणारी एक स्टेटमेंट जारी करण्यात आली आहे. यामध्ये गौहरने एकापेक्षा अधिक कोविड टेस्ट केल्या होत्या. त्यामध्ये निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट आल्यानंतरच ती शूटिंगला गेली होती. दरम्यान गौहर ही नियम पाळणारी एक जबाबदार नागरिक असल्याचं म्हटलं आहे.
गौहर खानचे वडील काही दिवसांपूर्वीच निर्वतले आहेत. त्यामुळे ती सध्या जात असलेल्या मानसिक स्थितीचा विचार व्हावा. शुभचिंतकांकडून गौहरला दिल्या जाणार्या शुभेच्छा आणि प्रार्थना यांच्यासाठी आम्ही आभारी आहोत असे देखील तिच्या स्टेटमेंट मध्ये सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
सध्या गौहर ज्या शूटिंगमध्ये सहभागी झाली होती ते थांबवण्यात आले असून कलाकार आणि क्रू मेंम्बर्स यांना क्वारंटीन करण्यात येणार आहे.