बिग बी पाठोपाठ आता सुप्रसिद्ध गायक अदनान सामीचंही ट्विटर अकाउंट हॅक
बिग बीं चे अकाउंट ज्याप्रकारे हॅक झाले आहे, त्याच पद्धतीने सामीचंही अकाउंट हॅक झालय.
सायबर क्राईम हे दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत असताना आता दिग्गज कलावंत देखील याच्या जाळ्यात अडकले जातायत. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी कानावर येते नं येते तोच आता गायक अदनान सामीचंही (Adnan Sami) ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. बिग बीं चे अकाउंट ज्याप्रकारे हॅक झाले आहे, त्याच पद्धतीने सामीचंही अकाउंट हॅक झालय.
हॅकर्सनी अदनान सामीच्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल पिक्चर बदलून त्याजागी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला आहे. अमिताभ यांच्याबाबतीतही हाच प्रकार करण्यात आला होता. अदनानच्या अकाउंटवर हॅकर्सनी अनेक ट्विट पोस्ट केलेत. यापैकी एक ट्विट पिन करण्यात आलं आहे. त्यात असं लिहिलंय की, 'जे कुणी आमचा मित्र देश पाकिस्तानसोबत दगा करतील त्यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं आणि पाकिस्तानच्या झेंड्याचं छायाचित्र प्रोफाइलवर दिसेल.'
अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक, भारताच्या विरोधात ट्विट व्हायरल
'तुझं अकाउंट तुर्कस्तानची सायबर आर्मी Ayyıldız Timने हॅक केलं आहे. तुझं बोलणं आणि महत्त्वाचा डेटाही ताब्यात घेतला आहे,' असंही हॅकर्सनी कळवलं आहे. अदनानने त्याचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती अन्य एका अकाउंटद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.