Adnan Sami's Mother Passes Away: अदनान सामी यांच्या आई Naureen Sami Khan यांचे निधन; गायकाने सोशल मीडियावर दिली माहिती
अदनान सामीने सोमवारी सकाळी घोषणा केली की त्याची आई बेगम नौरीन सामी खान यांचे 7 ऑक्टोबर रोजी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. गायकाने आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.
Adnan Sami's Mother Passes Away: प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) ची आई नौरीन सामी खान (Naureen Sami Khan) यांच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली आहे. 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक असलेल्या अदनानने आपल्या मधुर संगीताने सर्वांची मने जिंकली आहेत. अदनान सामीने सोमवारी सकाळी घोषणा केली की त्याची आई बेगम नौरीन सामी खान यांचे 7 ऑक्टोबर रोजी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. गायकाने आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.
अदनानने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या आईच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अदनान सामीने लिहिले की, 'माझी लाडकी आई बेगम नौरीन सामी खान यांच्या निधनाबद्दल मी तुम्हा सर्वांना अत्यंत दुःखाने कळवत आहे... आम्हाला खूप दुःख झाले आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ती एक अविश्वसनीय स्त्री होती जी प्रत्येक व्यक्तीशी अत्यंत आदराने वागली आणि त्यांच्याबरोबर प्रेमाने आणि आनंदाने जगली. आम्हाला त्याची खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. अल्लाह आमच्या प्रिय आईला जन्नत-उल-फिर्दौसमध्ये आशीर्वाद देवो...आमेन.' (हेही वाचा - Rajinikanth Emotional Note After Getting Discharged: डिस्चार्ज मिळाल्यानंतर रजनीकांत यांची भावनिक पोस्ट; पंतप्रधान मोदींसह मानले सर्व चाहत्यांचे आभार)
It’s with the greatest sadness & infinite sorrow that I announce the demise of our beloved Mother Begum Naureen Sami Khan…
We are overtaken by profound grief. She was an incredible lady who shared love & joy with everyone she touched. We will miss her immensely.
Kindly say a… pic.twitter.com/SH7AnpVJYL
— Adnan Sami (@AdnanSamiLive) October 7, 2024
गायक अदनान सामी यांची आई नौरीन सामी खान यांचे निधन -
गायकाने ही दु:खत बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी याबद्दल शोक व्यक्त केला. अदनान सामीचा जन्म 15 ऑगस्ट 1971 रोजी लंडनमध्ये झाला आणि तो तिथेच मोठा झाला. त्याचे वडील अर्शद सामी खान हे अफगाण होते. तर आई नौरीन खान जम्मूची होती. अदनानचे वडील पाकिस्तानी हवाई दलात पायलट होते. त्यानंतर त्यांनी 14 देशांमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2024 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

