Aditya Narayan Wedding: येत्या 1 डिसेंबरला आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल अडकणार विवाहबंधनात, पंतप्रधान मोदी, अमिताभ बच्चन सह अनेक दिग्गजांना दिले आमंत्रण

त्यानंतर अनेक वर्षांच्या रिलेशिपनंतर आता विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाला अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे.

Aditya Narayan Wedding (Photo Credits: Instagram)

सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) येत्या 1 डिसेंबरला श्वेता अग्रवाल (Shweta Agrawal) हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक सेलिब्रिटींचे लग्न लांबणीवर पडले होते. त्यात आदित्य-श्वेताचे लग्न देखील होते. मात्र आता लग्नसराई सुरु असल्यामुळे येत्या 1 डिसेंबरला शुभमुहूर्तावर हे दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. हे दोघे 11 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. आदित्यची श्वेताशी ओळख त्यांचा पहिला चित्रपट 'शापित' दरम्यान झाली. त्यानंतर अनेक वर्षांच्या रिलेशिपनंतर आता विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाला अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे.

या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महानायक अमिताभ बच्चन अन्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने हे लग्न होणार असल्याची माहिती उदित नारायण यांनी दिली आहे. हे लग्न एका मंदिरात होणार असून दुस-या दिवशी म्हणजे 2 डिसेंबरला पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन देण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- Aditya Narayan Wedding: या वर्षाच्या अखेरीस आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत अडकणार लग्न बंधनात

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial)

उदित नारायण पुढे असेही म्हणाले "मी या इंडस्ट्री अनेक वर्षांपासून जोडला गेलेलो आहे. मग या लग्नात कुणाला बोलावणार नाही असे कसे होईल. मात्र अनेक मोठी मंडळी कदाचित कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे लग्नाला येणार नाहीत. मात्र आम्ही आमच्या बाजूने पूर्ण तयारी केली आहे."

"आमचे लग्न देखील मंदिरात झाले होते. मात्र तेव्हा आमच्याकडे इतके पैसे नव्हते की आम्ही लोकांना जेवण वगैरे ठेवून मोठा समारंभ करु. मात्र आता आदित्यच्या लग्नात आम्ही काही कमतरता ठेवणार नाही. आदित्य आणि श्वेताचा संगीताचा देखील कार्यक्रम होणार आहे" अशी माहिती उदित नारायण यांनी दिली आहे