Actress Shashikala Jawalkar Passes Away: अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शशिकला यांनी सुमारे 100 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांचे पूर्ण नाव शशिकला जावळकर असे होते. सोलापूर जिल्ह्यात त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932 रोजी झाला होता.

Shashikala | (Photo Credits: Twitter)

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री शशिकला (Shashikala ) यांचे निधन झाले आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. रविवारी (4 मार्च 2021) दुपारी त्यांनी राहत्या खरी अखेरचा श्वास घेतला. शशिकला जवळकर (Shashikala Jawalkar Passes Away ) यांनी प्रदीर्घ काळा मराठी आणि हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात घर केले. सातत्याने हसतमुख आणि कमालिच्या उत्साही असलेल्या शशिकला (Shashikala Passes Away) यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे नव्या जुण्या असा सर्व कलाकारांमध्ये शशिकला यांचा वावर असे. त्यांच्याबाबत सर्वजणच आदराने बोलत असत.

वैविध्यपूर्ण भूमिका आणि कसदरा अभिनय यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक उंची प्राप्त झाली होती. भारतीय चित्रपटसृष्टी म्हणावी तितकी प्रगतशील नसतानाही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. त्यामुळे एक वेगळ्या धाटनीची अभिनेत्री म्हणून नेहमीच त्यांचे नाव घेतले जायचे. कालांतराने छोटा पडदा विस्तारला. त्यानंतर त्यांनी टीव्हीसारख्या छोट्या पडद्यावरही काम केले. (हेही वाचा, Shrikant Moghe Passed Away: ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन)

फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रथम शशिकला यांच्या निधनाबाबत वृत्त दिले. शशिकला यांच्या निधनाबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शशिकला यांनी 70 च्या दशकात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

शशिकला यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शशिकला यांनी सुमारे 100 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांचे पूर्ण नाव शशिकला जावळकर असे होते. सोलापूर जिल्ह्यात त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932 रोजी झाला होता.