जायरा वसीम च्या वक्तव्यावर रवीना टंडन ने केली आगपाखड, असा विचार करणा-यांनी शांती ने निघून जाण्याचा दिला सल्ला

अभिनेत्री रवीना टंडन सोशल मिडिया द्वारे आपली बाजू मांडत जायरा ने केलेले विधान आपल्याला अजिबात पटलेले नसून तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून तिचा खरपूस समाचार घेतला आहे.

Raveena Tandon (Photo Credits: Instagram)

सुपरहिट चित्रपट दंगल (Dangal) आणि सीक्रेट सुपरस्टार (Secret Superstar) सारखे चित्रपट देणारी अभिनेत्री जायरा वसीम (Zaira Wasim) ही ने फिल्म इंडस्ट्री सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर तिच्या वक्तव्याचे पडसाद फिल्म इंडस्ट्रीत उमटण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या स्तरातून तिच्या या वक्तव्यावर प्रशंसेसोबत टीकेचेही झोड उठत आहे. त्यातच बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हीने सुद्धा या वादात उडी मारली आहे. सोशल मिडिया द्वारे या वादात आपली बाजू मांडत जायरा ने केलेले विधान आपल्याला अजिबात पटलेले नसून तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून तिचा खरपूस समाचार घेतला आहे.

रवीना टंडन ने आपल्या ट्वटर अकाउंटवर असे म्हटले आहे की, ' केवळ २ चित्रपटांनी नाव कमावणारी जर फिल्म इंडस्ट्री बद्दल अकृतज्ञ असेल, तर काही विशेष फरक पडत नाही. या लोकांकडून केवळ हीच अपेक्षा करू शकतो की, ते गुपचूप येथून निघून जावे. तुमचे बुरसटलेले विचार तुमच्याजवळच ठेवा.'

त्याचबरोबर रवीना ने यूजर ला उत्तर देताना असे म्हटले आहे की, "मी माझ्या इंडस्ट्रीवर प्रेम करते आणि मी नेहमी त्याच्या सोबत असेल. माझी इंडस्ट्री नेहमीच सर्वांना संधी देत आली आहे. या इंडस्ट्रीत प्रत्येकजण खांद्याला खांदा लावून चालतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या जातीचे आहात, धर्माचे आहात किंवा कुठून आलेले आहात, याने काही एक फरक पडत नाही."

अलीकडेच जायरा वसीम ने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरुन अशी बातमी दिली होती की, ती फिल्म इंडस्ट्री सोडत आहे. जायरा ने असे सांगितले की, फिल्म इंडस्ट्री मध्ये आल्यानंतर मी माझ्या ईमानाशी भटकली होती. आणि स्वत:ला खोटे आश्वासन देत होती की, ते योग्य आहे. मात्र सत्य जास्त दिवस लपून राहत नाही. त्यामुळे मी माझ्या धर्माच्या रस्त्यावर परत जात आहे.

हेही वाचा - अभिनेत्री झायरा वासीम हिची बॉलिवूडमधून एक्झिट

ती पुढे असेही म्हणाली की, "मला धर्माच्या मार्गावर आत्मिक शांती मिळते आणि मला तोच मार्ग स्विकारायचा आहे. तसेच तिने आपल्या पवित्र कुराणातील काही गोष्टी लोकांपुढे मांडून सांगितले की, ती आता याच शिकवणीचे पालन करुन आपले जीवन जगणार आहे. "