अभिनेत्री प्रियंका चोपड़ा ला जेवणात आवडतो हा 'मराठमोळा' पदार्थ; ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

East India Comedy दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाला तिच्या या सवयीविषयी विचारण्यात आलं. त्यावर प्रियांका म्हणाली, 'मला माझ्या जेवणासोबत नेहमीच लोणचं लागतं. त्याशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही.'

Priyanka Chopra | (Photo Credits: Instagram)

मराठमोळ्या पदार्थांची भुरळ मुंबईसह देशविदेशातील लोकांना पडली आहे. मग त्यात बॉलिवूडकर देखील कसे मागे राहतील. बॉलिवूडमध्ये अगदी सलमान खान पासून आलिया भट्ट पर्यंत सर्वांना मराठी पद्धतीने जेवण फार आवडते. यात आणखी एक नाव जोडलं गेलय ते बॉलिवूड प्रमाणे हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखविण्यात यशस्वी ठरलेली बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra). बॉलिवूडची देसी गर्ल आता विदेशी गर्ल आणि विदेशी सून ही झाली आहे. अमेरिकन गायक निक जोनासशी विवाहबद्ध झाल्यानंतर प्रियंका बराच काळापासून बॉलिवूड जगताशी दूर राहिली तसेच आपल्या देशापासून ती सध्या परदेशात आपल्या पती सोबत वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसली. मात्र परदेशी गेलेली प्रियंका देशाला विसरली अशी चर्चा रंगत असताना प्रियंकाने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

प्रियंकाने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला जेवणात एक मराठमोळा पदार्थ आवडतो असे सांगितले. East India Comedy दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाला तिच्या या सवयीविषयी विचारण्यात आलं. त्यावर प्रियांका म्हणाली, 'मला माझ्या जेवणासोबत नेहमीच लोणचं लागतं. त्याशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही.'

हेदेखील वाचा- प्रियंका चोपड़ा आणि निक जोनास यांची प्रेमकहाणी लवकरच पडद्यावर; 'देसीगर्ल' बनवत आहे स्वतःच्या लग्नावर चित्रपट

प्रियांका सांगते, 'मला लोणचं खूप आवडतं. मी सॅन्डविचसोबतही लोणचं खाते. जर तुम्ही चीज सॅन्डविच खात असाल तर त्याच्यासोबत आंब्याचं लोणचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. त्यात करून घरगुती आंब्याचं लोणचं सर्वात बेस्ट असतं.' असं प्रियंका म्हणाली.

बॉलिवूडकरांमध्ये प्रियंका चोपड़ा चे लग्न हा देखील तितकाच चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे आपल्या निक आणि आपल्या लव्हस्टोरीवर चित्रपट करावा अशी प्रियंकाची इच्छा होती. एका मुलाखतीमध्ये प्रियंकाने आपण आपल्या लग्नावर एक चित्रपट बनवत असल्याचा खुलासा केला आहे. हा एक विनोदी चित्रपट (Comedy Film) असून यामध्ये प्रियंका आणि निकची (Nick Jonas) लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif