अभिनेत्री सारा अली खानच्या या कृत्यामुळे आई अमृता सिंग ला लपवावे लागले आपले तोंड, Watch Video
नुकताच तिने सोशल मिडियावर एक असा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामुळे तिच्या आईला म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग (Amruta Singh) ला चक्क स्वत:चे तोंड लपवायची वेळ आली.
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या कार्तिक आर्यनसह असलेल्या अफेअरमुळे बरीच चर्चेत आहे. तसेच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळेही ती बरीच चर्चेत असते. त्याचबरोबर सोशल मिडियावरही ती बरीच सक्रीय असते. त्यामुळे चाहतेही तिला रोज सोशल मिडियाद्वारे तिला फॉलो करत असतात. त्यामुळे तिचे अपडेट्सही तिच्यापर्यंत पोहोचत असतात. नुकताच तिने सोशल मिडियावर एक असा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामुळे तिच्या आईला म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग (Amruta Singh) ला चक्क स्वत:चे तोंड लपवायची वेळ आली.
सारा अली खान हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 31 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पाहा व्हिडिओ
ह्या व्हिडिओमध्ये अमृता सिंग एका हॉटेलात डोसा खाताना दिसत आहे, ज्यात तिच्या समोर एक भला मोठा डोसा दिसत आहे. आपली मुलगी आपल्याला शूट करत असल्यामुळे तिने लाजून आपले तोंड लपवले आहे. हेदेखील वाचा- सारा अली खान च्या Viral Video मुळे घरातून पळून गेलेल्या मुलाची कुटुंबाशी भेट (Watch Video)
'मी आणि माझी आई जेव्हा एकत्र खायला बसतो तेव्हा आम्ही आमचे डाएट विसरुन जातो', असे लिहिले आहे. हेदेखील वाचा- सारा अली खान चा हा 'अगडबम' फोटो पाहून अभिनेता कार्तिक आर्यन ने केले असे मजेशीर कमेंट, वाचा सविस्तर
सध्या सारा आपल्या आगामी चित्रपट 'कूल नंबर 1' च्या रिमेक च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत अभिनेता वरुण धवनसोबत झळकणार आहे. यात सारा अली खान (Sara Ali Khan) आणि वरुण धवन (Varun Dhawan) चा अंतरंगी लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. 1 मे 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.