Aditi Rao Hydari-Siddharth Marriage: अभिनेत्री अदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले लग्नबंधनात, See Pics
दोघांनी यावर्षी मार्चमध्ये गुपचूप लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केले. एंगेजमेंटनंतर सर्वजण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आज पुन्हा एकदा दोघांनी अचानक लग्नाचे फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Aditi Rao Hydari-Siddharth Marriage: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि सिद्धार्थ (Siddharth) लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी यावर्षी मार्चमध्ये गुपचूप लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केले. एंगेजमेंटनंतर सर्वजण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आज पुन्हा एकदा दोघांनी अचानक लग्नाचे फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. फोटो शेअर करताना आदिती राव हैदरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तू माझा सूर्य आहेस, मी तुझा चंद्र आणि माझे सर्व तारे... शेवटपर्यंत पिक्सी सोलमेट राहा...श्रीमती आणि मिस्टर अदू-सिद्धू.' दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न केले. फोटोमध्ये त्यांचा लूक अगदी पारंपारिक दिसत आहे.
आदितीने तिच्या लग्नात पारंपारिक दक्षिण भारतीय लेहेंगा परिधान केला होता. बेज रंगाच्या या लेहेंग्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. यासोबत तिने टिश्यू फॅब्रिकचा दुपट्टा कॅरी केला होता. तिच्या लेहेंग्याला जड गोल्डन बॉर्डर दिसत आहेत. ज्यामुळे लेहेंगा खूपचं भारी दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने कॅरी केलेल्या ब्लाउजवरही सोनेरी लेस आहे. (हेही वाचा - Ganeshotsav 2024: सलमान खान, अर्पिता खान यांनी घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन (View Pics))
अदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले लग्नबंधनात, पहा फोटोज -
केस आणि मेकअपने जिंकले मन -
अदिती बहुतेक वेळा कमीतकमी मेकअपमध्ये दिसते. अशा परिस्थितीत तिने लग्नाच्या दिवशीही खूप हलका मेकअप केला होता. यासोबतच अभिनेत्रीने केसांची वेणी बांधून त्यावर गजरा बांधला होता. नववधूने तिच्या लग्नाच्या दिवशी खूप कमी मेहंदी लावली होती. तिच्या हातावर फक्त चंद्र दिसत आहे.
आदितीसोबत सिद्धार्थने या खास दिवसासाठी दक्षिण भारतीय पोशाखही निवडला. दक्षिण भारतातील पारंपारिक वेष्टी आणि कुर्तामध्ये सिद्धार्थ खूपच हँडसम दिसत होता. हे फोटो समोर आल्यानंतर सर्वजण नवीन जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)