Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान याच्या सुरक्षेत चूक, दोन अनोळखी व्यक्ती मन्नतमध्ये घुसल्या, तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या

मुंबई शहरातील वांद्रे येथील शाहरुख खान याच्या मन्नत (Mannat) बंगल्यात दोन अनोळखी व्यक्ती घुसल्या. सुरक्षा (Shah Rukh Khan’s Security अथवा इतर कोणतेच संकेत न पाळता या व्यक्तींनी थेट मन्नतचा तिसरा मजला गाठला. ही घटना गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली.

Shah Rukh Khan (PC - Facebook)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या सुरक्षेत मोठी चुक झाल्याचे पुढे आले आहे. मुंबई शहरातील वांद्रे येथील शाहरुख खान याच्या मन्नत (Mannat) बंगल्यात दोन अनोळखी व्यक्ती घुसल्या. सुरक्षा (Shah Rukh Khan’s Security अथवा इतर कोणतेच संकेत न पाळता या व्यक्तींनी थेट मन्नतचा तिसरा मजला गाठला. ही घटना गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, या व्यक्ती गुजरातमधील सूरत येथील दोन युवक आहेत. खरेतर मन्नत बाहेर आणि आतमध्येही सुरक्षारक्षकांचा मोठा ताफा असतो. अत्यंत कडेकोट सुरक्षा असूनही या दोघांनी सुरक्षारक्षकांना चकवा कसा दिला? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शाहरुख खान याच्या बंगल्यात बेकायदेशीरपणे घुसलेले हे लोक चक्क तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले. तेव्हा कुठे सुरक्षारक्षकांना त्यांचा संशय आला आणि त्यांनी या दोघांना रोखले. दोघांनाही पकडून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही युवकांचे वय अनुक्रमे 21 आणि 25 वर्षे आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, कोणाच्याही बंगल्यात विनापरवानगी घुसणे तसेच इतर आरोपांखाली भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Shah Rukh Khan: शाहरुख खान अभिनयातून कधी निवृत्ती घेणार? चाहत्यांच्या प्रश्नावर किंग खानने केला खुलासा)

ट्विट

शाहरुख खान याचा 'पठाण' सिनेमा नुकताच प्रदर्शीत झाला. या सिनेमालाही प्रचंड विरोध झाला. मात्र, प्रचंड विरोधानंतर प्रदर्शीत झालेल्या सिनेमाने कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. शाहरुखच्या या यशाचे कौतुक होत असतानाच त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी पुढे आली. शाहरुखची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात लखनऊ येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबईत राहणारे किरीट जसवंत शाह यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे की, त्यांनी लखनऊमध्ये तुलसियानी कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेड मध्ये कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. त्यांनी आतापर्यंत बिल्डरला 86 लाख रुपये दिले आहेत. परंतू, इतके पैसे देऊनही त्यांना आतापर्यंत फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. शाहरुखची पत्नी गौरी खान या कंपनीची ब्रांड अॅम्बेसडर आहे. त्यामुळे आपण गौरी खान हिच्याविरोधात तक्रार दिल्याचा त्यांचा दावा आहे. एफआयआरम मध्ये कंपनीचे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि डायरेक्टर महेश तुलसियानी यांच्यावरही किरीट शाह यांनी गंभीर आरोप केले आहेत.