Actor Salman Khan ला पुन्हा Lawrence Bishnoi च्या नावे धमकी; 'जिवंत रहायचं असेल तर...' Mumbai Police Traffic Control ला मेसेज

पोलिसांकडून ज्या नंबर वरून सलमान खानला धमकी मिळाली आहे त्याचा शोध सुरू असल्याचं म्हटलं आहे.

Salman Khan (PC - Instagram)

अभिनेता सलमान खान (Salman Khan) ला पुन्हा लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) च्या नावे धमकी आली आहे. Mumbai Police Traffic Control ला मॅसेज वर त्याला धमकी आली आहे. यामध्ये ' मी लॉरेन्स बिष्णोई चा भाऊ आहे. जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याने देवळात जाऊन माफी मागावी अन्यथा 5 कोटी द्यावे लागतील. जर त्याने असं केलं नाही तर आम्ही त्याला ठार मारू. आमची गॅंग अजून अ‍ॅक्टिव्ह आहे.' असे नमूद केले अअहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे.

सलमान खानला मिळालेल्या नव्या धमकी नंतर आता मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून ज्या नंबर वरून सलमान खानला धमकी मिळाली आहे त्याचा शोध सुरू असल्याचं म्हटलं आहे.

सलमान खानला धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वीही बिष्णोई गॅंग कडून सलमानला धमकी पाठवण्यात आली आहे. यामध्ये सलमान खानच्या घराजवळ गोळीबार देखील झाला आहे.  Salman Khan Death Threat: 'चूक झाली...'; सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी .

सलमान खान आणि सध्या तुरूंगात असलेल्या गॅंगस्टार लॉरेन्स बिष्णोई यांच्यामध्ये वाद 1998 पासून सुरू आहे. सलमान विरूद्ध काळ्या हरणाच्या शिकारी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर 2018 मध्ये लॉरेन्स ने जोधपूर कोर्टात हजेरी दरम्यान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ज्या काळ्या हरणाला सलमानने मारल्याचा आरोप आहे ते बिष्णोई समाजासाठी पूजनीय आहे. त्यामुळेच भावना दुखावल्याने बिष्णोईंमध्ये त्याच्या विरूद्ध मोठा राग आहे.

धमकींच्या सत्रानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खान सध्या हैदराबाद मध्ये 'सिकंदर' या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif