Coronavirus पासून सुरक्षित राहण्यासाठी अभिनेते दिलीप कुमार देखील Self Quarantine मध्ये! ट्वीट करत दिला चाहत्यांना 'हा' सल्ला!

तर देशामध्ये कोरोना बाधित 125 जण असून जगात 1 लाख 60 हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. तर जगात 6500 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिलीप कुमार (Photo Credits: Twitter)

जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. सध्या सर्वसमान्यांना कोरोना व्हायरसपासून रोखण्यासाठी कमीत कमी सोशल डिस्टंस ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मग कोरोनाला रोखण्यासाठी आता बॉलिवूड कलाकारदेखील सज्ज आहेत. दरम्यान 97 वर्षीय बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार (Diliip Kumar) देखील घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी ट्वीट करत पत्नी सायरा बानू यंनी इन्फेक्शन रोखण्यासाठी सारे प्रयत्न केल्याचं सांगत चाहत्यांनाही सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांनी ट्वीट करत, 'मी पूर्णपणे आयसोलेशन आणि विलगीकरणामध्ये आहे. पत्नी सायराबानू कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन होऊ नये म्हणून माझी पूर्ण काळजी घेत आहे.' असं ट्वीट केलं आहे. दरम्यान तुम्ही देखील संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो घरामध्येच रहा. सध्या कोरोना व्हायरस सार्‍या सीमा पर करत जगभर पसरत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचा अवलंब करा.

दरम्यान दिलीप कुमार यांचे वय 90 च्या पार असून त्यांना यापूर्वी फुफ्फुसांच्या आजारांचा पूर्व इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या रूग्णांची विशेष काळजी घेणं हे प्रधान्य आहे.  सनी लियोन हिने Coronavirus चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आपल्या कुटूंबासोबत उचचले हे पाऊल, फोटो शेअर करुन आपल्या मुलांबाबत व्यक्त केली काळजी

दिलीप कुमार यांचे ट्वीट  

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 39 असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर देशामध्ये कोरोना बाधित 125 जण असून जगात 1 लाख 60 हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. तर जगात 6500 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.