दिग्दर्शक फराह खान च्या मुलीने बनवलेल्या स्केचला अभिषेक बच्चन ने दिले 1 लाख रुपये, ज्युनिअर बी चे आभार मानत मात्र Farah ने त्याला दिली 'ही' नावडती गोष्ट
तिचे हे सुंदर स्केच बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने 1 लाख रुपये देऊन खरेदी केले.
बॉलिवूडची सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शक फराह खान (Farah Khan) सध्या खूपच आनंदात आहेत. याचे कारण म्हणजे तिची मुलगी अन्या कुंदर कोरोना व्हायरससारख्या महामारीमध्ये आपले अमूल्य योगदान दिले आहे. तिने गरजूंना मदत करण्यासाठी स्वत:च्या हाताने एक स्केच बनवले आणि हे स्केच विकण्याचे ठरविले. या बदल्यात येणारे पैसे तिने गरजूंना दान करण्याचे ठरविले. तिचे हे सुंदर स्केच बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने 1 लाख रुपये देऊन खरेदी केले. अन्या चे देशाप्रती प्रेम आणि एवढ्या छोट्या वयात सामाजिकतेचे भान पाहून अभिषेक बच्चन ने हा निर्णय घेतला.
छोट्या अन्याचा हा प्रयत्न आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अबिषेकने हे स्केच 1 लाखाला खरेदी केले. अभिषेक दिलेली ही भली मोठी रक्कम पाहून फराह खान भारावून गेली. आणि तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिषेक धन्यवाद मानले आहेत. अभिषेक बच्चन याच्या 'जनता कर्फ्यू' च्या संदेशावर ट्रोल करणा-यांवर भडकला ज्युनिअर बी, अशा शब्दांत दिले उत्तर
या पोस्ट खाली फराह ने "एका स्केच ला कोणी 1 लाख रुपये देते का? मात्र अभिषेक बच्चन च्या या मोठ्या योगदानामुळे अन्याची चॅरिटी दुप्पट झाली आहे. धन्यवाद माझे दिलदार दोस्त" असे म्हटले आहे. त्यासोबत अभिषेकला न आवडणारी खूप सारी झप्पी देखील तिने पाठविली आहे.
फराह ने इन्स्टाग्राम वर तिचा आणि अभिषेक एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत अन्याचा देखील स्केचसह फोटो शेअर केला आहे.
अन्या ने या स्केचच्या माध्यमातून याआधीच 1 लाख रुपये जमा केले होते. आता अभिषेक मुळे तिची ही रक्कम दुप्पट होऊन 2 लाख रुपये झाली आहे.