Aamir Khan Smokes Pipe During Instagram Live: आमिर खानने इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान केलं धुम्रपान; चाहत्याने अभिनेत्याला दिला 'असा' सल्ला

चाहत्यांच्या प्रश्नांसह अभिनेता त्याच्या माजी पत्नी किरण रावच्या 'लापता लेडीज' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. यावेळी अभिनेता थेट व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यासमोर धूम्रपान करताना दिसला. लोकांनी पहिल्यांदाच आमिर खानला धूम्रपान करताना पाहिले आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या या कृतीने चाहतेही हैराण झाले आहेत.

Aamir Khan (PC - Instagram)

Aamir Khan Smokes Pipe During Instagram Live: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan)चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेता लाईव्ह येऊन त्याच्या चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. आमिर खानने इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओमध्ये चाहत्यांशी संवाद साधला आहे. चाहत्यांच्या प्रश्नांसह अभिनेता त्याच्या माजी पत्नी किरण रावच्या 'लापता लेडीज' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. यावेळी अभिनेता थेट व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यासमोर धूम्रपान करताना दिसला. लोकांनी पहिल्यांदाच आमिर खानला धूम्रपान करताना पाहिले आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या या कृतीने चाहतेही हैराण झाले आहेत.

आमिर खानने साधला चाहत्यांशी संवाद -

आमिर खानने आज इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना संबोधित केले. निळ्या रंगाचा डेनिम शर्ट परिधान केलेला अभिनेता कॅज्युअल लूकमध्ये दिसला. आमिरने त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या इंस्टाग्राम पेजवरून लाइव्ह केले. अभिनेत्याने सर्वप्रथम त्याच्या 'लपता लेडीज' चित्रपटाचे प्रमोशन केले. ज्या चित्रपटांमध्ये मोठे स्टार नाहीत, असे चित्रपटही प्रेक्षकांनी पाहावेत, असे तो म्हणतो. (हेही वाचा - Aamir Khan New Look: 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा नवा खतरनाक लुक चर्चेत, फोटो व्हायरल)

लाईव्ह व्हिडिओमध्ये आमिर खान हातात सिगार पेटवून धूर सोडताना दिसत होता. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता धुम्रपान करताना दिसत आहे. आमिरची ही स्टाईल पाहून काही लोक दंग झाले आहेत. काही युजर्सनी याला पब्लिसिटी स्टंट असेही म्हटले आहे. (हेही वाचा - Ira Khan- Nupur Shikhare Wedding: अभिनेता Aamir Khan च्या लेकीच्या लग्नविधींना सुरूवात; Kiran Rao लेक Azad Rao Khan सह सोहळ्याला उपस्थित)

पहा व्हिडिओ- 

एका यूजरने आमिर खानला लाईव्हदरम्यान विचारले की, जामनगरमध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग पार्टीत डान्स केला, पण मुलगी इरा खानच्या लग्नात का नाही? त्यावर मुकेश अंबानी हे त्यांचे जवळचे मित्र असल्याचे आमिरने सांगितले. याशिवाय एका चाहत्याने आमिर खानला विचारले की, तो शाहरुख खानचा पठाणसारखा चित्रपट का आणत नाही? यावर अभिनेता म्हणाला, अरे भाऊ, शाहरुख पठाण सारखे चांगले चित्रपट बनवतो, मी लपता लेडीज सारखे चित्रपट बनवतो, म्हणजे तू बघ. याशिवाय, एका यूजने या व्हिडिओवर कमेंट करताना आमिरला 'ड्रग्स घेणे थांबवा' असा सल्ला दिला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now