Mothers Day 2020: 'मदर्स डे' निमित्त बॉलिवुड अभिनेता आयुषमान खुराना ने तयार केलं खास गाणं; पहा व्हिडिओ
'माँ' असे या गाण्याचे बोल आहेत. आयुषमानने या दिवसाचं निमित्त साधत आपल्या भारतमातेसाठी आणि आईसाठी हे गाणं तयार केलं आहे. 'मदर्स डे'च्या दिवशी म्हणजेच 10 मे ला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mothers Day 2020: 'मदर्स डे' निमित्त बॉलिवुड अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) ने खास गाणं तयार केलं आहे. 'माँ' असे या गाण्याचे बोल आहेत. आयुषमानने या दिवसाचं निमित्त साधत आपल्या भारतमातेसाठी आणि आईसाठी हे गाणं तयार केलं आहे. 'मदर्स डे'च्या दिवशी म्हणजेच 10 मे ला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आयुषमानने या गाण्याची एक झलक सादर केली आहे. यात त्याने म्हटलं आहे की, एक आई आपल्या मुलांसाठी वाट्टेल ते करायला तयार असते. त्यांच्यावर ती निस्वार्थ प्रेम करते. त्यांच्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करते. त्यामुळे खरं तर प्रत्येक दिवशी मदर्स डे साजरा केला पाहिजे. परंतु, ठीक आहे हा एक दिवसदेखील तिच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे निदान या दिवशी तरी आपण तिच्यासाठी काही तरी करावं. (हेही वाचा - आज रात्री 9 वाजता सुरु होणार KBC कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन, 'या' पद्धतीने तुम्ही सहभागी होऊ शकता)
या मदर्स डे निमित्त मी सर्व मातांसाठी ‘माँ’ हे गाणं तयार केलं आहे. आईचं प्रेम पाहून मी कायम थक्क होतो. त्यामुळे माझी अनेक गाणी आईला समर्पित केलेली असतात. या गाण्याला संगीतकार रोचक कोहली यांनी संगीत दिलं आहे. यंदा 10 मे ला सर्वत्र मदर्स डे साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या आईसाठी गिफ्टही बनवून ठेवलं आहे.