गर्भवती अभिनेत्री एमी जैक्सन चे टॉपलेस फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या अशा विचित्र प्रतिक्रिया
या फोटोमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
एक काळ होता जेव्हा आपण गर्भवती असल्याचे महिला लपवायचे. मात्र आता बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरने प्रेग्नंसीला इतक्या मोकळेपणाने लोकांसमोर दाखवल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये सध्या तो ट्रेंडच बनलाय. त्यात आता पर्यंत समीरा रेड्डी, नेहा धुपिया, इशा देओल यांसारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना आपल्या प्रेग्नंसीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले. त्यातच आता 7 महिन्याची गरोदर (Pregnant) असलेल्या अभिनेत्री एमी जैक्सन (Amy Jackson) ने बेबी बंपसह आपले टॉपलेस फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
या फोटोत तिने आपल्या डोक्यात एक मोठी हॅट घातली असून सेमी-न्यूड (Semi Nude)पोज दिली आहे.
हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात काहींशी तिच्या सुंदरतेचे आणि तिच्या धाडसाचे कौतुक केले असून काहींनी तिच्या सेमी-न्यूड पोज वर नाराजी दर्शविली आहे. त्यात एकाने तिला ट्रोल करत म्हटले आहे की, "जर तू डोक्यात एवढी मोठी हॅट घालू शकतेस तर अंगभर कपडे का घालू शकत नाही."
लग्नाआधी गरोदर राहिलेल्या एमी जैक्सन ने याआधी चक्क आपला हॉस्पीटलमधला अल्ट्रा साऊंड व्हिडीओ (Ultrasound Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अॅमीच्या बाळाची हालचाल दिसत असून, हा व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे. आपली इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून अॅमीने हा व्हिडिओ शेअर केला होता.